देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क:अहिल्यानगर दि : 9 फेब्रुवारी – अहिल्यानगर जिल्हा व शहर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने नवीन कार्यकारी निवडीसाठी महत्त्वपूर्ण बैठक बुधवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजी नगर रोड अहिल्यानगर येथे होणार असल्याची माहिती पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली.
ही बैठक पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा लघुउद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष ( राज्यमंत्री दर्जा ) जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. नुकतीच जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्याने या बैठकीत नवीन कार्यकारणीची निवड होणार आहे. तसेच पार्टीचे विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि नागरिकांच्या विविध अडचणी समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. तसेच यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांची लघुउद्योग विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर जिल्ह्याचे वतीने भव्य सत्कार करण्यात येणार आहे. तसेच १२ फेब्रुवारी जयदीप कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळेचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे .
तरी या बैठकीला जिल्ह्यातील पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड व महिला जिल्हाध्यक्षा गौतमीताई भिंगारदिवे यांनी केले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा