सामाजिक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्याबाबत पूर्णकृती पुतळा समितीची बैठक संपन्न! येत्या २० मार्च ते १ एप्रिल दरम्यान पूर्णकृती पुतळा विराजमान होणार!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क:अहिल्यानगर दि. 8 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड चौकात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या उभारणीचे काम पूर्ण झाले असून, आता केवळ पुतळा स्थापनेचा सोहळा पार पाडण्याचे काम बाकी आहे. यासाठी शहरातील आंबेडकरी समाज व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा समितीच्या वतीने हॉटेल राजयोग येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मान्यवरांनी पुतळा स्थापना सोहळ्याबाबत आपली मते मांडली. चर्चेनंतर २० मार्च ते १ एप्रिल या कालावधीत स्थापना सोहळ्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत येत्या १० फेब्रुवारी रोजी शेवटची बैठक होणार आहे. या बैठकीत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थकृती पुतळा आयुक्तांनी पुढाकार घेऊन पालिकेत बसवण्यात यावा तसेच अशोक गायकवाड यांनी पूर्णाकृती पुतळा समितीच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेबाबत सर्व आंबेडकरी समाज व पूर्णाकृती समितीच्या वतीने समितीमधून हकालपट्टी करण्यात आली तसेच इथून पुढे अधिकृत पुतळा समिती पूर्णाकृती पुतळा अनावरण होईपर्यंत सर्व अधिकृत कामे करेल तसेच या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते संभाजीराव भिंगारदिवे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, अजय साळवे, किरण दाभाडे, सुनील शिंदे, सुनील क्षेत्रे, रोहित आव्हाड, योगेश साठे, संजय जगताप, संजय कांबळे, विजय गव्हाळे, सागर ठोकळ, अमित काळे, विलास साठे, प्रा.जाधव सर, प्रशांत गायकवाड, बंटी भिंगारदिवे, महेश भोसले , गौतमीताई भिंगारदिवे, विशाल गायकवाड, पोपट जाधव, वैभव कांबळे, मेहेर भिंगारदिवे, जीवन कांबळे, डॉ.भास्कर रणनवरे, शिवाजी भोसले, सिद्धांत कांबळे, अंकुश मोहिते, संजय शिंदे, सारंग पाटेकर, गणेश गायकवाड, आदित्य विधाते, सिद्धांत साठे, जय कदम, तेजस संगले, आकाश कदम, स्वयम् भिंगारदिवे, सागर विधाते, विजित कुमार थोंबे, रंजना भिंगारदिवे, हिराबाई भिंगारदिवे, संजय साळवे, सुरेश भिंगार दिवे, अशोक खंडागळे, विशाल भिंगार दिवे, अशोक रणदिवे, श्याम पाचारण, दीपक अमुत, आकाश निरभवणे, दीपक लोंढे, सुहास पाटोळे, अक्षय भिंगार दिवे, अमेय रणदिवे, मंगेश मोकल, सतीश शिरसाठ, समीर भिंगारदिवे, ऍड.संदीप पाखरे, विजय कदम, सचिन शेलार, दिनेश पंडित, प्रदीप शेलार, सचिन साठे, रत्न तूपविहिते, आकाश फुलारे, ऋषि विधाते आदीसह पदाधिकारी तसेच आंबेडकरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर बैठकीचे सूत्रसंचालन युवा नेते सिद्धार्थ आढाव सर यांनी केले.

पूर्णकृती पुतळा समितीचे पदाधिकारी आणि सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, अहिल्यानगरच्या ऐतिहासिक घडामोडीत हा सोहळा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे