राजकिय

आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण : सुरेशभाऊ बनसोडे आंबेडकरनगर माळीवाडा जेष्ठ नेते सुनील शिंदे,सुजित घंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संम्पन्न

अहिल्यानगर दि. 12 नोव्हेंबर (प्रतिनिधी )अहिल्यानगर नगर शहर मतदार संघांचे महायुती आजित पवार गटाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ आंबेडकरनगर माळीवाडा येथील समाजमंदिर येथे राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे यांच्या अध्यक्षते खाली व जेष्ठ नेते सुनील शिंदे, सुजित घंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेण्यात आली.यावेळी बोलतांना सुरेश बनसोडे म्हणाले, 25 वर्षापूर्वी जे आमदार होते त्यांनी कधीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा प्रश्न घेतला नाही. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळी ला बरोबर घेत आमदार संग्राम जगताप यांनी न्यालय, उच्च न्यायलय येथे पाठपुरावा करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा पूर्ण केला. त्यांनी पाठपुरावा केला नसता तर अजून 50 वर्ष पुतळ्याच्यासाठी आपल्याला थांबावे लागले असते, आपली पिढी संपली असती, त्यांनी समाज मंदिरे, बौद्ध विहारे त्यांच्या आमदार निधीतून आपल्याला बांधून दिली आहेत, म्हणूनच येणाऱ्या 20 नोव्हेंबर ला अनु. 4 व घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आमदार संग्राम जगताप यांना मोठया मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते सुनील शिंदे यांनी विकास कामाच्या जोरावर आमदार संग्राम जगताप हे बहुमताने निवडून येथील असा विश्वास व्यक्त केला.

माळीवाडा भागातील नेते सुजित घंगाळे यांनी माळीवाडा भागातील आंबेडकर नगर येथून आमदार संग्राम जगताप यांना मोठे मताधिक्य मिळवून देऊ असा निर्धार या बैठकीच्या निमिताने व्यक्त केला.

या बैठकीस, सुजित घंगाळे,समीर भिंगारदिवे, प्रकाश विधाते, ऋषी विधाते, आरपीआय आठवले गटाचे युवक जिल्हा अध्यक्ष अमित काळे, माजी सरपंच युवराज पाखरे, गणेश सोनवणे,मनोज साळवे, युवराज उमाप, राहुल आल्हाट, रवी कर्डक, प्रणव पाडळे, रोहित केदारी, बाबासाहेब नवगिरे, शुभम भिंगारदिवे, अभिजित भिंगारदिवे, गौतम विधाते, निलेश रंधवे, वीरेन विधाते, रवी साठे, विकी साठे, मुन्ना साठे, संदीप शेलार, गणेश मिसाळ, चंद्रकांत वाघमारे, ओम भिंगारदिवे, भैया साठे, अमित वाघमारे, यश ओहोळ आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे