नगर शहरातील विकासासाठी अभिषेक कळमकर यांचा निर्धार, बोल्हेगाव-नागापूर भागात नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

अहिल्यानगर दि. 12 नोव्हेंबर (प्रतिनिधी )नगर शहर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी आपल्या प्रचार दौऱ्यात बोल्हेगाव आणि नागापूर या भागाला भेट देऊन केली. नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या प्रचार फेरीमध्ये नागरिकांनी कळमकर यांना खंबीर पाठिंबा देण्याचे आश्वासन देत, त्यांच्याबरोबर उभे राहण्याची भूमिका मांडली.
अभिषेक कळमकर यांनी आपल्या भाषणात नगर शहरातील सर्वांगीण विकासासाठी कृतिशील योजना मांडल्या. त्यांनी या परिसरात मोठी MIDC डेव्हल करून तेथे एक कामगार वसाहत स्थापन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या MIDC च्या माध्यमातून हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा कळमकर यांचा मनोदय आहे. याशिवाय कामगारांसाठी अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज असे कामगार रुग्णालय उभारून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे आश्वासन दिले. यामुळे कामगारांना वैद्यकीय सुविधा मिळवण्यासाठी अन्यत्र जाण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना अभिषेक कळमकर यांनी नागरिकांना “तुतारी वाजविणारा माणूस” या चिन्हासमोरचे बटन दाबून मतरूपी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले. नगर शहराच्या विकासासाठी, महिलांच्या सुरक्षिततेसाठी, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी, तसेच सामाजिक एकोपा साधण्यासाठी कळमकर यांनी आपले कामकाज स्पष्ट केले. नगर शहराचे सर्वांगीण विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी जनतेच्या मतांची गरज आहे, असे ते म्हणाले.
या प्रचार दौऱ्यात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते दत्ता जाधव, संभाजी कदम, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे प्रचाराला विशेष उर्जा मिळाली असून, कळमकर यांचा संकल्प दृढ झाला आहे.
**शहराच्या विकासासाठी संकल्प**
नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरुकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट अभिषेक कळमकर यांचे आहे. या दौऱ्यात त्यांनी शहराच्या एकूणच विकासाची आपली योजना स्पष्ट केली. MIDC, कामगार वसाहत, कामगार रुग्णालय, महिलांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पावले, आणि शहरात रोजगार निर्मितीचे केंद्र निर्माण करणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
नगर शहरातील नागरिकांनी या संकल्पाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. शहराच्या उज्वल भविष्यासाठी कळमकर यांच्या नेतृत्वात एक नवा अध्याय सुरू होणार असल्याची आशा यावेळी उपस्थितांमध्ये व्यक्त झाली.