दगडवाडीत दलित महासंघाच्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न!

पाथर्डी (प्रतिनिधी)
अहमदनगर जिल्ह्यातील, पाथर्डी तालुक्यातील दगडवाडी येथे नवीन वर्षाचे औचित्य साधुन तसेच राष्ट्र संत तनपुरे महाराज यांच्या पावन भूमीत,दलित महासंघाच्या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ सुलाखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हाध्यक्ष मा.संजय चांदणे आणि जिल्हाकार्याध्यक्ष मा.ऍड. लक्ष्मण बोरुडे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी जिल्हासंपर्क प्रमुख मा.कडूबाबा लोंढे, जिल्हाप्रसिद्धी प्रमुख मा.वजीरभाई शेख , जिल्हा संघटक शशिकांत नवगिरे सर,सरपंच मा.सचिन शिंदे, बंडू पाडळे यांच्या उपस्थितीत पार पडला.
शाखा अध्यक्ष गोरक्षनाथ उमाप,अरुण उमाप , भरत उमाप,आदिनाथ उमाप,लक्ष्मण उमाप,अशोक उमाप,महिला आघाडीच्या जयश्री उमाप,सुनीता उमाप,काजल उमाप, राजश्री उमाप,आदी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.