अहिल्यानगर दि. 28 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) अहिल्यानगर महायुतीचे अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी रविवारी सकाळी प्रभाग क्रमांक 9 मध्ये विकास यात्रा काढत प्रभागातील नागरिकांशी संवाद साधला तोफखाना, बागडपट्टी, सिद्धार्थनगर बौध्दवस्ती, कवडेनगर, गवळीवाडा याठिकाणी आमदार जगताप यांची विकास यात्रा परिसरातील नागरिकांच्या समवेत काढण्यात आली.
यावेळी माजी नगरसेवक धनंजय जाधव, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशभाऊ बनसोडे, माजी नगरसेवक दगडू मामा पवार, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जेष्ठ नेते नितीन कसबेकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा अध्यक्ष सुमेध गायकवाड, संजय खामकर, आरपीआय आठवले गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, सुनील भवर, अंकुश मोहिते, मयूर राऊत, शशी गायकवाड, कौशल गायकवाड,विशाल गायकवाड, गणेश गायकवाड, सिद्धांत गायकवाड, निखिल साळवे, संघराज गायकवाड, नरेंद्र गायकवाड, साधना बोरुडे त्याचप्रमाणे प्रभागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा