आरोग्य सेविका व कर्मचारी यांच्या हलगर्जी व चुकी मुळे प्रसुति !
डॉक्टर,आरोग्य सेविका,यांच्यावर कार्यवाई न झाल्यास ऑल इंडिया पँथर सेना ठिय्या आंदोलन करणार!
– अहमदनगर (प्रतिनिधी)शाहू-फुले -आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अहमदनगर जिल्ह्या मध्ये देवळाली प्रवरा या गावा मध्ये १३ जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रा मध्ये एका महिलेची रस्त्यावर प्रसूती झाली.
डॉक्टर ,आरोग्य सेविका व कर्मचारी यांच्या हलगर्जी व चुकी मुळे प्रसुति झाली .ही घटना माणुसकी ला काळीमा फासनारी होती तरी सुद्धा हे प्रकरण दडपण्याचा केविलवाणा प्रकार संबंधित लोकांकडून चालू आहे .अद्यापपर्यन्त कोणावरही कारवाई अथवा निलंबन झाले नाही आहे. आणि तेथील डॉक्टर वर आणि आरोग्य सेविका आणि कर्मचारी यांच्या वर राजकीय वरदहस्त असल्यामुळे तेथील स्थानिक कार्यकर्ते यांनी आम्हाला सांगितले त्यामुळे संबंधित डॉक्टर व आरोग्य सेविका व कर्मचारी यांच्या वर कारवाई झाली नाही तर आपल्या दालनात समस्त स्थानिक नागरिक व कार्यक्रत्या समवेत ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा आक्रमक इशारा ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाअद्यक्ष योगेश थोरात यांनी दिला आहे.