अहमदनगर दि. 13 सप्टेंबर (प्रतिनिधी ) जेष्ठ बांधकाम व्यावसायिक कैलास ढोरे यांचा 60 वा वाढदिवस नुकताच दिल्लीगेट येथे जेष्ठ नागरिकांच्या वतीने साजरा करण्यात आला.
यावेळी त्यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देत पेढा भरवून सन्मान करण्यात आला. यावेळी जेष्ठ नेते गोवर्धन नळकांडे, उमेश साळी, नितीन किराणा स्टोअर्सचे संचालक नितीनशेठ पटवा, अरुण सुरसे, विनोद गोंधळे, विठ्ठलराव जाधव आदी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी सत्कारमूर्ती ढोरे यांना पुढील जीवनासाठी शुभेच्छा देत त्यांचे अभिष्टचिंतन केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा