(जामखेड : प्रतिनिधी रोहित राजगुरू)
येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या वतीने ताकतीने लढणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांनी व्यक्त केले.
ते जामखेड येथे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख कैलास विलास माने (सर ) .यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिल्यानंतर बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष बापूसाहेब शिंदे डॉ.झेंडे .पिंटू वस्ताद माने .कपिल भाऊ माने .पत्रकार दत्तराज पवार .रोहित राजगुरू .पप्पूभाई सय्यद, अजय अवसरे, इत्यादी उपस्थित होते.
ते बोलताना पुढे म्हणाले की, राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली असून ती महिलांमध्ये लोकप्रिय झाली आहे, राज्यातील महिला महायुतीच्या बाजूने कौल देतील त्याचा फायदा नक्कीच सरकारला होणार आहे.
अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांचा समन्वय घडवून आणण्यासाठी मी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा महायुतीच्या आणण्यासाठी ताकतीने लढवून राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे असे शेवटी नाहटा म्हणाले.
शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष कैलास माने सर म्हणाले की, महायुतीच्या वतीने ज्या पक्षाचा उमेदवार दिला जाईल त्याचे प्रामाणिकपणे काम करून महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा