जामखेड एसटी बस डेपो परिसरामध्ये चिखलाचे साम्राज्य!

जामखेड दि. 27 जुलै (प्रतिनिधी रोहित राजगुरू ) मागील तीन चार दिवसाच्या रिमझिम पावसाने चिखलाचे साम्राज्य झाले आहे. तसेच एसटी डेपो मध्ये वर्कशॉप मध्ये कर्मचाऱ्यांना कोणतेही काम करता येत नाही .त्यामुळे शाळकरी मुले मुली व महिला वृद्ध पर्यटकांना चिखलाचा सामना करावा लागत आहे .येथे कोणत्या सुविधा नसल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी आहे.तसेच एसटी डेपो परिसरामध्ये डांबरीकरण सिमेंट किंवा पेव्हर ब्लॉक काम होणे गरजेचे आहे .त्यातच परिसरात मोकाट जनावराचाही मोठ्या प्रमाणात वाहनधारक प्रवाशांनात्रास सहन करावा लागतो .
प्रवाशांना बसण्यासाठी बाकडे अपुरे पडत आहेत .यामुळे प्रवासी यांना ताटकळत उभे राहावे लागते .शालेय विद्यार्थ्यांना वेळेवर बस मिळत नसल्याने त्यांचे हाल होतात तसेच पाण्याची सोय नाही उपहारगृह नाही .विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे .सामाजिक बांधिलकी जपत या अडचणी समजून शिवसेना तालुकाप्रमुख मा .कैलास माने सर .यांनी कामाची दखल घेऊन हे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे असे सांगितले .