घर सोडून गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांना 12 तासाच्या आत घरपोच पोहोचवल्या बद्दल तोफखाना पोलिसांचे कौतुक
पोलिसांच्या चांगल्या कामगिरीबद्दल साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने सत्कार.

अहमदनगर दि.२८(प्रतिनिधी)- नगर कल्याण रोड येथील साईराम सामाजिक सोसायटी येथील 2 मुले घर सोडून निघून गेले असता. त्यांना शोधण्यासाठी तोफखाना पोलीस स्टेशन येथे कळवळून तक्रार दिली असता. तोफखाना पोलीस स्टेशनचे पी.आय व कर्मचारी यांनी जलदगतीने मुलांना शोधण्यासाठी पथक रवाना केले व मुंबई येथे विटी स्टेशन वर शोधून त्यांना सुखरूप 12 तासाच्या आत घरी पोहोचवल्या बद्दल तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर, उपनिरीक्षक समाधान सोळंकी, पोलीस नाईक एस.बडे, सचिन जगताप, देविदास आव्हाड, दत्तात्रेय जपे, साईनाथ सुपारे, ज्ञानेश्वर मोरे, राहुल गुंडू, नंदकुमार सांगळे, गोविंद गोल्हार आदींनी चांगली कामगिरी केल्याबद्दल साईराम सामाजिक सोसायटीच्या वतीने सत्कार करताना साईराम सामाजिक सोसायटीचे अध्यक्ष सुनील शिंदे समवेत सचिव श्रीपाद वाघमारे, उपाध्यक्ष दत्ता पारखे, आजिनाथ केंदळे, सोमनाथ बोराडे, शंकर बोरुडे, श्रीनिवास श्रीराम आदीसह अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी साईराम सोसायटीचे अध्यक्ष सुनिल शिंदे म्हणाले की पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमुळे पोलिसांनी जलदगतीने शोध मोहीम हाती घेऊन मुलांना 24 तासाच्या आत सुखरूप घरपोच केल्याबद्दल सर्व साई राम सामाजिक सोसायटी कॉलनी च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच पोलिसांच्या चांगल्या कामगिरीबद्दल साईराम सोसायटीच्या नागरीकांनी कौतुक केले.