वावरथ जांभळी जाणा-या ग्रामिण भागातील रस्त्यांना विशेष जिल्हा मार्ग दर्जा:प्राजक्तदादा तनपुरे

राहुरी ( प्रतिनिधी) – तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या वावरथ,जांभळी व जांभुळबन ग्रामस्थांची धरणाच्या पाण्यातुन प्रवास करतांना होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी बारागांव नादुर वावरथ जांभळी ढवळपुरी रस्त्याला विशेष जिल्हा मार्ग दर्जा मिळाला असल्याचे राज्याचे नगरविका उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्तदादा तनपुरे यांनी सांगितले.
पुढे बोलतांना मंत्री तनपुरे म्हणाले की, पाटबंधारे खात्याकडुन वावरथ जांभळी येथे जाण्याकरीता पुल बांधणीसाठी मुळा धरणाच्या पाण्याखालील ठाव गाठत रु.१७ लाख रुपये खर्चुन पुल बांधणी सर्वेक्षण करुन अहवाल सादर करण्यात आला आहे. बारागांव नांदुर ,वावरथ,जांभळी ,जांभूळबन या ३१.९०० किमी लांबीच्या रस्त्याला जिल्हा दर्जा मिळाल्याचे शासन आदेश झालेले आहे. विधानसभेपुर्वी या भागातील जनतेला तनपुरे यांनी शब्द दिला होता. या रस्त्यामळे पुणे येथे जाणा-या वाहनांचा सुमारे २५ ते ३० तर मुंबई येथे जाणेकरीता ५५ ते ६० किमी अंतर कमी होणार आहे. भविष्यात या भागात पुल बांधणी अडथळा दुर झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार बारागांव नांदुर वावरथ जांभळी ढवळपुरी या ३९ किमी रस्त्याला आता विशेष जिल्हा मार्गाचा दर्जा मिळालेला असुन या भागासाठी आनंदाची बाब आहे. रस्ता होत असतांना लगतच्या चार ते पाच गावांतुन जिल्हा मार्ग जाणार असल्याचे शासनाने परीपत्रकाव्दारे जाहिर केलेले आहे. या मार्ग निश्चितीमुळे बारागांव नांदुर ,वावरथ,जांभळी ,जांभुळबन या गावांचे भाग्य उजाळणार असल्याने परीसरातील जनतेने मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे विशेष आभार व्यक्त करीत आनंद व्यक्त केला आहे.