गुन्हेगारी

1,40,000/- रुपये किमतीच्या 04 चोरीच्या मोटारसायकल हस्तगत, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर दि. 20 ऑगस्ट : मा. श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील वाहन चोरीचे घटनांमधील आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, शाहिद शेख, राहुल द्वारके, फुरकान शेख, प्रकाश मांडगे, विशाल तनपुरे, सतिष भवर, प्रशांत राठोड, अरुण मोरे यांचे पथक तयार करुन सदर पथकास वाहन चोरीचे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढणेबाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना करण्यात आले होते.
सदर पथकाने अहिल्यानगर शहरातील यापुर्वी वाहन चोरी झालेल्या घटनाठिकाणी भेटी देवुन अशाप्रकारे गुन्हे करणारे आरोपींची माहिती संकलित करण्यात आली. दिनांक 19/08/2025 रोजी पथकास गुप्त बातमीदारामार्फत एक इसम चोरीची मोटारसायकल विक्री करण्याकरीता राधाबाई काळे महाविद्यालय परिसरामध्ये येणार असल्याची माहिती मिळाली. पथक बातमीतील ठिकाणी सापळा रचुन थांबले असता एक संशयीत इसम विनानंबरचे मोटारसायकलवर येतांना दिसला. सदर इसमास थांबवुन त्याचेकडील वाहनाबाबत चौकशी केली असता सदरची मोटारसायकल ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. सदर इसमास ताब्यात घेवुन त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव 1) सुनिल उर्फ बबलु दत्तात्रय आजबे वय 29 वर्षे, रा. प्रेमदार हाडको, सावेडी, अहिल्यानगर, मुळ रा. देवटाकळी, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीस त्याने आणखी इतर काही मोटारसायकल चोरी केलेल्या आहेत काय याबाबत तपास करता त्याने त्याचा साथीदार 2) हनुमंत उर्फ सचिन अंकुश झाडे रा.सामनगांव, ता. शेवगांव, जि. अहिल्यानगर(फरार) याचे मदतीने मोटारसायकली चोरी केल्याचे सांगितले असुन ताब्यातील आरोपीचे कब्जातुन 1,40,000/- रुपये किमतीच्या खालील 04 मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
अ.नं. मोटारसायकल मॉडेल चेसी नंबर इंजिन नंबर
1 होंडा शाईन ME4JC855JLD000564 JC85ED0130358
2 होंडा शाईन ME4JC36JHD7554869 JC36E7831547
3 बजाज प्लॅटीना MD2A76AZXGWG03140 PFZWGG57894
4 हिरो होंडा स्प्लेंडर MBLHA10EJAHG37554 HA10EAAHG47456
वरील मोटारसायकल पैकी, अ. नं. 1 बाबत तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं. 836/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305(ब) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. ताब्यातील आरोपीस तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे