नेवासा येथील गोरगरीब जनतेला वाली आहे का? पोलीस नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अंबादास जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला

अहमदनगर दि.१४ जुलै (प्रतिनिधी)- देवसडे ता.नेवासा येथील सामाजिक कार्यकर्ते अंबादास मारुती जाधव यांनी दि.१४/०७/२०२२ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे की तालुक्यातील सरकारी प्रशासनातील अधिकारी,पोलीसस्टेशन मधील कर्मचारी,तहसीलदारां सह तहसील ऑफिस मधील कर्मचारी,तलाठी,सर्कल जनतेचे कामे वेळेवर करत नसुन कायम टाळाटाळ करत आहेत.तसेच नेवासा तहसीलदार यांना वारंवार कोणत्याही प्रकारच्या कामाचे वेळोवेळी अर्ज करून कोणतेही काम वेळेत करत नसुन फक्त पदाचा गैरवापर करत आहेत. नागरिकांनी खराब रस्त्या विषयी तक्रार केली तरी अनेक बोगस गुन्हे या ठिकाणी नागरिकांवर दाखल झालेले आहेत.तसेच स्थानिक पोलीस स्टेशन नेवासा यांच्याकडे नागरिकांनी कोणतीही तक्रार घेऊन गेल्यास तुला जेलमध्ये टाकतो व केस करतो अशा प्रकारे धाक दाखवून पैसे उकळण्याचे काम केले जातात.तसेच नेवासा पोलीस स्टेशनचे पो.कॉ.भताने व पो.पाटील विठ्ठल भाऊसाहेब घोडेचोर,एजंट राजू गिऱ्हे व डीवायएसपी/मुंढे यांनी संगनमताने केस नं.६५६/२०२१ यामध्ये १५ लाखाची अफरातफर केली आहे,याबाबतीत माझ्याकडे सबळ पुरावा असून वेळ आल्यावर ते जनतेसमोर दाखवू असे जाधव यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.व ॲट्रॉसिटी या कायद्याचा गैरवापर करून जनतेवर सरसकट तपास न करता गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकून नागरिकांना त्रास दिला आहे व देत आहे.२०२१ या सालात किती नागरिकांवर या अशा खोट्या गुन्ह्यांची गुन्ह्याची नोंद केली आहे त्यांना जेलमध्ये धाडले आहे याची संपूर्ण माहिती घ्यायला हवी,नेवासा तालुका वकील संघातील काही ठराविक वकील यांनी कोर्टाची व सामान्य नागरिकांची दिशाभूल केली आहे. नागरिक त्यांच्याकडे गेले असता त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फी घेऊन त्यांना जामीन पत्र दाखल न करणे सदर वकीला कडून केस काढून घेण्यास नागरिकांचे अडवणूक करून संघटनेतील वकिलांना केस घेऊ देत नाहीत व त्यांना धाक दाखवतात वकीलपत्र घेण्यास प्रवृत्त करतात,तसेच भादवि कलम ३५४.३५४ ब ३२३,३२४,५०४,५०६,१४३,१४७ या गुन्ह्याच्या व खोट्या गुन्ह्याच्या केसेस मध्ये महिलांना अडकवले आहे.तसेच गुन्हा रजिस्टर नंबर ६५६/२०२१ या केस मध्ये तीन महिला विनूबाई मारुती जाधव,नंदिनी अंबादास जाधव, रेणुका अभय जाधव सदर या महिलां मध्ये एक महिला गरोदर होती व दुसऱ्या एका महिलेला दोन वर्षाची मुलगी होती व तिसरी शुगरग्रस्त पेशंट वृद्ध महिला होती असे असतानाही या महिलांना ७५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले.यापैकी कोणतीही घटना वास्तव घडली नसतानाही खोटे गुन्हे लावून जेलमध्ये ठेवण्यात आले. सदरील घटना घटना नेवासा तालुक्यात सर्रासपणे घडल्या आहेत व घडत आहेत सामान्य नागरिकांना कोणी वालीच उरलेला नाही म्हणून जनतेला न्याय मिळावा या साठी सामाजिक कार्यकर्ते अंबादास मारुती जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली.