सामाजिक

रोजगार नसल्याने दिव्यांगावर भिक मागण्याची वेळ सावली दिव्यांग संघटनेच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांचे भिक मागो आंदोलन

शेवगाव दि.४ जुलै (प्रतिनीधी) रोजगार हमी योजनेमध्ये पात्र दिव्यांगाना रोजगार देण्याचे आदेश असतांनाही मागणी करूनही दिव्यांगांना काम दिले गेले नाही काम न दिल्याने बेरोजगार भत्ता मागणी करुनही मिळत नसल्याने शेवगाव तालुक्यातील दिव्यांग मेटाकुटीला आले आहेत. दिव्यांगाना रोजगार नसल्याने त्यांचा उदरनिर्वाह चालवणे कठीण झाले आहे. रोजगार संबधी यंत्रना दिव्यांगांना रोजगार देण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाही.
रोजगार मिळत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सावली दिव्यांग संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव शहरामध्ये दिव्यांगांनी भिक मागो आंदोलन केले. आंदोलनाची सुरूवात घोषणा देत शेवगाव तहसील कार्यालयापासुन ते बाजारपेठ,पंचायत समिती पर्यंत करण्यात आली.
आंदोलनावेळी प्रशासकीय धोणाविषयी दिव्यांगाच्या भावना तीव्र होत्या शासनाच्या निष्क्रीयतेमुळे दिव्यांगाना भिक मागण्याची वेळ आलेली आहे अशी प्रतिक्रिया यावेळी बोलतांना सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख म्हणाले.
शासन दिव्यांगाच्या दारी हे अभियान फक्त गाजर दिखाव असुन दिव्यांगाना फक्त आशेवर ठेवण्याचे काम शासनाकडुन होत असल्याचे यावेळी उपस्थित अनेक दिव्यांगानी सांगीतले.
यावेळी दिव्यांगांनी भिक्षा मागो आंदोलनातुन भीक मागून 270 रुपये इतकी भिक्षा जमली असून सदर रक्कम ही शासनाचा निषेध म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये रजिस्टर पोस्टाने पाठवणार असल्याचे सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चांद शेख यांनी सांगीतले.
यावेळी उपस्थीतांना राहुल गुरव तहसीलदार शेवगाव व कदम साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांनी दिव्यांगाना काम देणेसाठी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी चांद शेख, संभाजी गुठे, नवनाथ औटी,मनोहर मराठे, खलील शेख, अनिल विघ्ने, गोवर्धन वांढेकर, शाम गुठे, शिवाजी आहेर, सुदाम माताडे, एकनाथ धाने,सुनिल वाळके, नंदकिशोर चिंतामणी,बबन गव्हाणे,सकू मिसाळ, सुरेखा गायकवाड, मिना ससाने,हिराबाई मिसाळ,वदंना तुजारे यांच्यासह अनेक दिव्यांग उपस्थीत होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे