गुन्हेगारी

अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या धडाकेबाज कारवाईला सलाम!२८ वर्षांपासून दाखल गुन्ह्यात प्रलंबित असलेले एकूण ६०५ किलो ७५२ ग्रॅम अमली पदार्थ केले नाश!

अहमदनगर दि.२७ (प्रतिनिधी): अहमदनगर जिल्हा पोलिस दलाच्या धडाकेबाज कारवाईला सलाम!२८ वर्षांपासून दाखल गुन्ह्यात प्रलंबित असलेले एकूण ६०५ किलो ७५२ ग्रॅम अमली पदार्थ केले नाश केल्याने जिल्हा पोलीस दलाविषयी नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अमली पदार्थ विरोधी कायदा सन १९८५ अन्वये अहमदनगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात सन १९९४ ते २०१५ पर्यन्त २६ गुन्ह्यात एकूण ६०५ किलो ७५२ ग्रॅम गांजा,अफु,गर्द, जप्त करण्यात आला होता.नमूद गुन्ह्यांचा मुदतीत तपास पूर्ण करून मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते मा. न्यायालयात नियमित सुनावणी होऊन न्यायालयाने प्रक्रिया पूर्ण करून मा.न्यायालयाने मुद्देमाल नाश करण्याबाबत मा.पाोलीस महासंचालक यांना आदेश दिले होते.मा.पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कडील आदेशान्वये श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर यांचे अध्यक्षतेखाली श्री.सौरभ कुमार अग्रवाल सदस्य तथा अप्पर पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री.मेघश्याम डांगे सदस्य तथा पोलीस उपअधीक्षक गृह अहमदनगर,श्री.अनील कटके सदस्य तथा पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर व स्थानिक गुन्हे शाखेतील अंमलदार सफौ.विष्णू घोडेचोर,पोहेकॉ. भाऊसाहेब कुरूंद,पोहेकॉ.सखाराम मोटे,पोहेकॉ.शरद बुधवंत,पोहेकॉ.देवेंद्र शेलार,पोना.शंकर चौधरी,पोना.संतोष लोंढे,पोकॉ.जयराम जंगले,चापोहेकॉ.अर्जुन बडे,चापोहेकॉ.संभाजी कोतकर,चापोहेकॉ.चंद्रकांत कुसळकर,अशांनी अहमदनगर जिल्ह्यातील सन १९९४ ते २०१५ पर्यन्त २६ गुन्ह्यात एकूण ६०५ किलो ७५२ ग्रॅम गांजा,अफू,गर्द असा २८ वर्षापासून नाश करण्यासाठी प्रलंबित असलेला अमली पदार्थ नाश करण्याचे योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दि.२७ एप्रिल २०२२ रोजी रांजणगाव एमआयडीसी जिल्हा पुणे येथील कंपनीत नाश केला आहे. यापूर्वी देखील २६ फेब्रुवारी २०२२ रोजी अशाच प्रकारे २८ वर्षांपासून प्रलंबित दाखल गुन्ह्यात असलेला अमली पदार्थ न्यायालयाच्या आदेशाने नाश करण्यात आला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे