राजकिय

सार्वजनिक बांधकाम विभागाचा जाहीर निषेध गांधीगिरी स्टाईलने खड्ड्यात बसून आंदोलन

माजी नगरसेवक ॲड. धनंजय जाधव सर्व दैनंदिन कामकाज करणार आता खड्ड्यात बसून

अहमदनगर (प्रतिनिधी)-राज्य सरकारने नगर विकास खात्यामार्फत शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी 3 वर्षांपूर्वी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.या निधीतून प्रभाग क्रमांक ९ मधील तोफखाना भागातील सुराणा बिल्डिंग ते मेहसुनी टेलर,शितळादेवी मंदिरा पर्यंतचे रस्त्याचे काम गेल्या ३ वर्षापासून मंजूर असूनही काम करत नसल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचा गांधीगिरी स्टाईलने खड्ड्यात बसून जाहीर निषेध करीत आहे.तोफखाना भागातील रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी मा.नगरसेवक ॲड धनंजय जाधव यांनी खड्ड्यात बसून आंदोलन सुरु केले यावेळी कल्पेश परदेशी , ऋषिकेश गुंडला, डॉ. प्रशांत सुरकरला, शामराव रोकडे,विशाल वाघमारे,संजय बोरा,मधुकर सावेडकर, प्रकाश दुस्सा, दिलीप गरके, विनोद राच्चा,रमेश कोडम, वैभव सावडेकर, सागर सावडेकर, सचिन दीवाने,राहुल मुथा,खंडू उदगीरकर आदी उपस्थित होते.मा.नगरसेवक ॲड.धनंजय जाधव म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाला गेल्या ३ वर्षापासून अनेकदा पत्रव्यवहार केले परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलीही दखल घेत नाहीत या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. येत्या काही महिन्यांमध्ये पावसाळा सुरु होईल त्यामुळे नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. या रस्त्याचे काम २०१९ मध्ये मंजूर असून आजपर्यंत पीडब्ल्यूडी ने हा रस्ता संबंधित ठेकेदाराकडून करून घ्यायचा आहे परंतु सातत्याने सांगितले जाते की संबंधित ठेकेदार काम करत नाही येथील नागरिकांना रस्त्याच्या प्रश्नांना सामोरे जावे लागते तरीही जोपर्यंत या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही रोज इथे बसून दैनंदिन कामकाज सुरू ठेवले जाईल असे अॅड.धनंजय जाधव म्हणाले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे