दुचाकीला वाचताना डिझेलचा टॅंकर पलटी : चालक किरकोळ जखमी!

जामखेड दि.२४ नोव्हेंबर (प्रतिनिधी)
समोरून येणारी दुचाकी वाचविण्यासाठी डिझेल घेऊन जाणा-या टॅंकर चालकाने वळणावर जाग्यावर ब्रेक मारल्याने टॅंकरने झोला मारल्यामुळे टॅंकर जागेवर पलटी झाला यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला. टॅंकर पलटी झाल्याने टाकी लिकेज होऊन जवळपास वीस हजार लिटर डिझेल वाया गेले. डिझेल घेण्यासाठी असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती. ही घटना बुधवारी तीनच्या सुमारास घडली.
याबाबत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली असता टॅंकर चालक नारायण दहीफळे ( रा. पाथर्डी) यांनी सांगितले की बुधवारी अहमदनगर येथून अकोळनेर डेपोतून १९ हजार डिझेल व ५ हजार पेट्रोल असा एकंदर २४ हजार लिटर तेल तालुका भुम येथे (टॅंकर क्रमांक एमएच १६ – बीसी १३१४) टॅंकर घेऊन जात असताना जामखेड तालुक्यातील राजुरी या गावात तीनच्या सुमारास आलो असता नदीच्या वळणावर ४० च्या स्पिडने असताना समोरून येणार्या दुचाकीला वाचवण्याचा प्रयत्न केला असता जागेवर ब्रेक मारला यामुळे टॅंकरने झोला मारला व जाग्यावर पलटी झाला. या अपघातात टॅंकर चालक किरकोळ जखमी झाला.
२४ हजार लिटरचा डिझेल टॅंकर पलटी होताच गावातील लोकांनी मिळेल त्या भांड्यात डिझेल घेण्यासाठी गर्दी केली. प्रत्यक्ष दर्शनी महादेव गिरी या युवकाने ताबोडतोब जामखेड पोलीसांना ही माहिती दिली असता पोलीस कॉन्स्टेबल सचिन सगर, सचिन देवडे, प्रवीण पालवे, दिनेश गंगे यांनी घटनास्थळी येऊन गर्दी पांगवली व वाहतूक सुरळीत केली. सुमारे चार तासानंतर क्रेनच्या साह्याने टॅंकर उभा केला