कौतुकास्पद

नदीपात्रातील वाळूची अवैध वाहतुक करणारे आरोपी विरुध्द कारवाई करुन ५,४०,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त! स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

अहमदनगर दि. 9 ऑगस्ट (प्रतिनिधी )
मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थाणुशा अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे बाचत आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी दिनांक ०८/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील पोना/संदीप दरंदले, पोकों/भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर,विशाल तनपुरे अशा पोलीस अंमलदारांना अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे कामी रवाना केले. सदर अंमलदार पारनेर परिसरात अवैध वाळू उत्खनन/उपसा बाबत माहिती काढत असताना पथकास गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे सलीम ऊर्फ भेव्या शेख रा. नांदगांव, ता. नगर हा सुतारवाडी, ता. पारनेर शिवारातील कापरी नदी पात्रातून बोटीच्या सहाय्याने नदीतील शासकीय वाळूचा चोरुन उपसा करुन इसम नामे ऋषीकेश सांगळे याचे पांढरे रंगाचे डेपरमध्ये भरुन अवैधरित्या वाहतूक करत आहे, आता गेल्यास मिळून येईल. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने लागलीच पंचाना सोबत घेवून बातमीतील नमुद ठिकाणी कापरी नदीपात्राचे कडेला जावुन पहाणी करता कापरी नदीपात्रात बोटीच्या सहाय्याने नदीपात्रातील शासकीय वाळू उपसा करुन, बोटीतील पाईपच्या सहाय्याने पांढरे रंगाचे डंपरमध्ये वाळू भरतांना दिसले. पथकाची खात्री होताच अचानक छापा टाकला असता नदीपात्रातील बोटीतील इसमास पोलीस पथकाची चाहुल लागताच ते बोट नदीपात्रातील पाण्यात घेवुन निघून गेला व डंपर चालक व त्याचा एक साचीदाराने ढवळपुरी ते वनकुटे जाणारे रोडवर ताब्यातील बंपर भरधाव वेगात चालवून वनकुटे शिवारातील दिवाजी वारे यांचे वस्तीवर उभा करुन बॅपरमधील वाळु खाली केली. त्यावेळी पथकाने दोन्ही इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) सचिन शिवाजी मोरे वय २१. रा. ढवळपुरी, ता. पारनेर (दंपर चालक), २) ऋषीकेश ऊर्फ बबलु राजु सांगळे वय २२. रा. सुतारवाडी, ता. पारनेर (दंपर मालक) असे सांगितले. त्यांचेकडे नदीपात्रातील बोटी कोणाचे मालकीची आहे अशी विचारणा करता त्यांनी नदीपत्रातील बोट ही ३) सलीम ऊर्फ भैय्या शेख रा. नांदगांव, ता. नगर (फरार) याचे मालकीची असल्याचे सांगितले. ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकीय मालकीची वाळू अवैधरित्या चोरी केल्याने र आरोपींना ५,००,०००/- रुपये किमतीचा टाटा कंपनीचा पांढरे व राखाडी रंगाचा बंपर व ४०,०००/- रुपये किंमतीची ४ ब्रास वाळु असा एकुण ५,४०,०००/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन पारनेर पो.स्टे.गु.र.नं. ५७७/२०२४ भान्यासंक ३०३ (२), ३ (५) सह प.सं.का.क. ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील कायदेशिर कारवाई पारनेर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेव, पोलीस अधीक्षक, अहमदनगर व श्री. प्रशांत खैरे साहेव, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्री. संपत भोसले साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे