सामाजिक

जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या निषेधार्थ जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली करण्याची मागणी

अहमदनगर दि. १७ जुलै (प्रतिनिधी)- मागील वर्षभरापूर्वी नगर जिल्ह्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची शासनाच्या वतीने नियुक्ती करण्यात आली. वास्तविक पाहता यापूर्वीचे असणारे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या त्वरित निर्णय घेण्याच्या भूमिकेमुळे नगर जिल्ह्यात पोलीस प्रशासनाचा चांगलाच जरब बसवला होता. त्यामुळे नगर शहरासह संपूर्ण जिल्हाभरात एक शांततामय वातावरण होते. मागील सहा ते सात महिन्यांमध्ये सातत्याने नगर शहरात तसेच जिल्ह्यात खून, दरोडे, चेन स्नॅचिंग असे मोठ्या प्रमाणात गुन्हे घडत आहेत. पोलिसांच्या कृपा आशीर्वादानेच मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय देखिल जिल्हा भर राजरोसपने सुरू आहेत. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मुलींच्या छेड काढणे, अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणे, या घटनांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तसेच सामान्य जनतेचे गुन्हे घेण्यास विलंब करणे, घेतलेल्या गुन्ह्यांचा तपास वेगाने न करणे, विशेष म्हणजे पळून गेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात जिल्हा पोलीस प्रशासन हे अपयशी ठरत आहे. जिल्हा भरातील गुंडांना पोलीस अधीक्षक यांचा धाक न राहिल्याने जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावत असून परिणामी सर्वसामान्य नागरिकांमध्ये अतिशय भीतीचे वातावरण आहे. जिल्हयात महिला व शालेय विद्यार्थिनी असुरक्षित असून. या सर्व बाबींचा आणि मागील पाच ते सहा महिन्यांत घडलेल्या घटनांचा विचार करून सर्व सामान्य जनतेच्या मनात पोलीस प्रशासना विषयी आदर आणि गुंडांना खाकीचा धाक निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक यांची तत्काळ बदली करण्याच्या मागणीसाठी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निषेध व्यक्त करून निवेदन देण्यात आले यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत किरण जावळे, गौतमीताई भिंगारदिवे, संतोष ढमाळे, शहानवाज शेख, अमित गांधी, दीपक गुगळे, मंगल पालवे, सुरेश कसाब आदी उपस्थित होते. पुढे निवेदनात म्हटले आहे की नगर जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी योग्य सक्षम पोलीस अधीक्षकाची नेमणूक करावी तसेच पोलीस अधीक्षकांची लवकरात लवकर बदली करण्याची मागणी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे