सामाजिक

केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शुक्रवार दि. १ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर दौऱ्यावर हरेगाव मारहाण प्रकरणी युवकांची व त्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट

अहमदनगर दि. २९ऑगस्ट (प्रतिनिधी)-केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले शुक्रवार दि. १ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर दौऱ्यावर येत असून हरेगाव मारहाण प्रकरणी
युवकांची व त्यांच्या कुटुंबीयांची घेणार भेट घेणार असल्याची माहिती युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे यांनी दिली आहे.
कबुतरे, शेळ्या चोरल्याच्या संशयावरुन हरेगावला (ता. श्रीरामपूर) मागासवर्गीय चार मुलांना अर्धनग्न करुन झाडाला उलटे टांगून क्रूरपणे मारहाण झालेल्या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला आहे.
मागासवर्गीय युवकांना अमानुषपणे मारहाणचे प्रकरण उघडकीस आले असताना ना. रामदास आठवले यांनी माणुसकीला कलंक लावणाऱ्या प्रकरणाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. तर शुक्रवारी घटनास्थळी देखील आठवले जाणार आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करुन खटला जलदगती न्यायालयात चालवून, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी व पीडित मुलांना न्याय मिळण्याची मागणी रिपाईच्या वतीने आठवले यांनी केली आहे.
हरेगावला रिपाईचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, राज्य सचिव दिपक गायकवाड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, विभागीय जिल्हाप्रमुख भिमराज बागुल, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, उत्तरचे युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, जिल्हा नेते विलास साठे सर, संजय कांबळे, नाना पाटोळे, आयटी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनिल शिरसाठ, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल कांबळे, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, कर्जत तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजा जगताप, पारनेर तालुकाध्यक्ष राजु उबाळे, पाथर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू, अकोले तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांडे, नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे, राहुरी तालुकाध्यक्ष विलास साळवे, कोपरगाव तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर, युवक जिल्हा सचिव दया गजभिये यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे