व्यावसाईक

अडत बंद करण्यास अहमदनगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा विरोध- संतोष बोरा

नगर दि. 17 फेब्रुवारी (प्रतिनिधी )- नुकतेच महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये अडत ही पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयास अडते बाजार मर्चंट असोसिएशन व मिरची मर्चंट असोसिएशन व जोगरी मर्चन्ट असोसिएशनने विरोध केला असल्याची माहिती अडत बाजार मर्चन्ट असोसिएशन चे सचिव संतोष बोरा यांनी महाराष्ट्र शासनास निवेदन पाठवून विरोध केला असल्याची माहिती दिली.
वास्तविक पाहता सन २०१८ चे महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक ६४ अन्वये महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये प्रस्तावित केलेल्या सुधारणेच्या अनुषंगाने शिफारस करण्याकरीता मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक दि.०५.०२.२०२४ रोजी होऊन सदर बैठकीत नवीन विधेयकात आडत बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आडते विना मोबदला कोणीही काम करणार नाही. आडत ही पद्धत फार पूर्वीपासून चालू आहे ती तशीच चालू ठेवण्यात यावी. आडत बंद करण्यात येऊ नये अशी सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे त्याकरिता राज्यातील शेतकरी, व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीकडून 23 . 2. 24 पर्यंत सुचना आणि हरकती मागविण्यात येत आहेत. सदर हरकती पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, ३रा मजला, नवीन मध्यवर्ती ईमारत, पुणे ४११००१ या पत्यावर व या कार्यालयाचे ई-मेल dirmktms@gmail.com वर सादर करता येतील. सदर बाबतीत हरकती घेणे जरुरीचे आहे त्याकरिता अहमदनगर जिल्ह्यातील सर्व व्यापारी अरोसिएशनने आपल्याआपल्या लेटरहेडवर सूचना व हरकती पाठविणे आवश्यक आहे असे आवाहन अहमदनगर अडते बाजार मर्चंट असोसिएशन च्या वतीने अध्यक्ष श्री. अशोकलालजी गांधी व सचिव श्री .संतोष बोरा यांनी केले आहे. त्याचप्रमाणे जोगरी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांतजी क्षीरसागर व मिरची मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष श्री. गोपालजी मणियार यांनी एका पत्रकानव्ये केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे