अहमदनगर दि. 17 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
एमआयडीसी पोलीसांनी नागापूर येथे अवैध धंद्यावर कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि,
1) अकिल पापाभाई शेख वय 37 वर्ष रा.एमआयडीसी अहमदनगर याच्या ताब्यात 3200/- रुपये किंमतीची 32 लिटर गावठी हातभट्टी ची तयार दारू मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
2)विशाल उर्फ डल्ली विष्णु शिंदे रा. नागापूर येथे संशयितरित्या मिळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात 1)980 रुपये किमतीच्या देशी दारूच्या 14 कॉटर 2) 900 रुपये किमतीच्या मॅकडॉल व्हिस्की च्या 6 कॉटर 3) 800 रुपये किमतीच्या इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की च्या 5 कॉटर 4)3000/- रुपये किमतीची 30 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू एका प्लास्टिकच्या ड्रममध्ये अशी एकून 5680/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर मुद्देमाल जप्त केले आहे करून गुन्हा दाखल केला आहे.
3) दीपक मनोहर शेखटकर रा. एमआयडीसी अहमदनगर हा एका टपरीच्या आडोशाला संशयितरित्या मिळून आल्याने त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात 3000/- रुपये किमतीची 30 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू मिळून आल्याने सदरची दारू पंचा समक्ष असा एकूण 11880/- रुपये किमतीची देशी-विदेशी, गावठी हातभट्टी ची तयार दारू जप्त करून वरील तिघा ईसमा विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हे दाखल केले आहे.
4) सुभाष वामन थोरात वय 45 वर्ष रा रेणुकानगर बोल्हेगावं ता जि अहमदनगर हा विना परवाना कल्याण मटका खेळताना व खेळविताना मिळून आला. म्हणून त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 1020 रुपये व कल्याण मटका खेळण्याचे साहित्य मिळून आल्याने त्याच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. असा एकूण 12900 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा