अहमदनगर दि. 16 फेब्रुवारी (प्रतिनिधी ):- पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत सर्व जिल्ह्यात विविध उपक्रम, कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचच एक भाग म्हणून 22 ते 25 फेब्रुवारी, 2024 दरम्यान येथील भिस्तबाग महल शेजारील मैदान, तपोवन रोडजवळ, अहमदनगर येथे ‘महासंस्कृती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते दि. 22 फेब्रुवारी रोजी या महोत्वाचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, विविध कला व संस्कृती जतन व संवर्धन तसेच स्वतंत्र लढ्यातील ज्ञात अज्ञात लढवयांची माहिती जनसमान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या ‘महासंस्कृती महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होत असून जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे.
या महोत्सवात विविध सांस्कृतिक महोत्सव सादर होणार असुन सकाळी 11-00 ते रात्री 10-00 या वेळेत या महोत्सवात सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. या महोत्सवात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या कृषी प्रदर्शनाबरोबरच विविध शासकीय विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल्स, बचतगटांचे स्टॉलही लावण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा