ब्रेकिंग

‘या ‘जिल्ह्यातील 32 लाख 06 हजार 700 रुपयाचे किंमतीचे 50 तोळे सोने चोरणारा मुख्य आरोपी राहुरी पोलीसांकडुन गजाआड!

राहुरी दि. 2 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
सातारा जिल्ह्यातील सातार शहर, बडुज, फलटण शहर कराड शहर, दहीवडी, कोरेगांव या बस स्थानकावर प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्याची एकुण 50 तोळे सोने (किंमत 32 लाख 06 हजार 700 रुपयाचे) चोरी करणारे महीला रुपाली अर्जुन सकट, गीता संदिप भोसले दोन्ही रा. जर्यासंगपुर जि. कोल्हापुर यांच्याकडुन चोरीचे सोने घेणारा सह आरोपी रफिक अजीज शेख रा. सांगली यांना सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली होती. परंतु गुन्ह्यातील मुख्य आरोपी संदिप झुंबर भोसले (काळे) रा. संभाजीनगर, जयसिंगपुर ता. शिरोळ जि. कोल्हापुर हा गुन्हा घडल्यापासुन फरार झाला होता. सदर आरोपी विरुध्द वडुज पोस्टे. गुरनं. 539/2023 भादंवि कलम 379, सातारा शहर पोस्टे. गुरनं. 966/2023 भादंवि कलम 379 असे गुन्हे दाखल असून सदर आरोपीची माहीती राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे यांना गोपनिय बातमीदारा मार्फत मिळाल्याने लागलीच पोनि, संजय ठेंगे यांनी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनच्या पोलीस स्टाफला माहीती देऊन सदर ठिकाणी जाऊन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने राहुरी पोलीस स्टाफ राहुरी रेल्वे स्टेशन येथे जाऊन मध्यप्रदेश राज्यात रेल्वेने फरार होणाऱ्या आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन विचारपुस केली असता आरोपीने सातारा जिल्ह्यात गुन्हे केल्याचे कबुल केल्याने आरोपीस राहुरी पोलीस स्टेशनला घेऊन येऊन सातारा जिल्हा पोलीस यांच्याशी संपर्क करुन आरोपी संदिप झुंबर भोसले (काळे) रा. संभाजीनगर, जयसिंगपुर ता. शिरोळ जि. कोल्हापुर यास सातारा जिल्हा पोलीस स्टाफ यांच्या ताब्यात दिले. सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला सो. पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. श्रीमती स्वाती भोर सो. अपर पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री. डॉ. बसवराज शिवपुजे सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जि. अहमदनगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संजय ठेंगे, पोउपनि. चारुदत्त खोंडे, पोहेकॉ. राहुल यादव, पोना. प्रविण बागुल, पोकॉ. गोवर्धन कदम, पोकॉ. प्रमोद ढाकणे,पोकॉ. गणेश लिपने, पोकॉ. नदिम शेख यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे