भोसे दि. 27 जानेवारी (प्रतिनिधी )देशाच्या इतिहासातील ऐतिहासिक प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा भोसे ता.कर्जत जि.अहमदनगर येथे ग्रामदैवत श्री रोकडेश्वर महाराज मंदिरामध्ये सोमवार दि.२२ जानेवारी रोजी मोठ्या उत्सवात तसेच भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी जय श्री राम च्या घोषणा देत रामलला मुर्तीची रथामधुन ग्रामप्रदक्षणा भोसे गावातील भजनी मंडळी व रामभक्तांच्या उपस्थिती मध्ये उत्साहाच्या वातावरणात पूर्ण करण्यात आली. याप्रसंगी भगवंताचे नामस्मरण,भजन तसेच फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी ब्राह्मण देवता मधुकर मुळे यांच्या उपस्थितीमध्ये महाआरती झाल्यानंतर महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. महाप्रसादाचे नियोजन श्री संत बाळूमामा मेंढी माऊली प्रतिष्ठानच्या वतीने दिगंबर दिलीप ढोले व संतोष क्षिरसागर यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमासाठी गावातील माजी तसेच विद्यमान सरपंच,चेअरमन,ग्रा.सदस्य, संचालक व नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सर्व पूर्वनियोजन माजी सरपंच राजेंद्र केशव ढोले व ज्येष्ठ नागरीक दौलतदादा क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते मयुर दादासाहेब खराडे तसेच बबन खराडे यांनी इतर रामभक्तांच्या मदतीने उत्तमरीत्या पार पाडले. अयोध्येतील प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे भोसे गावात अनादांचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा