गुन्हेगारी

जामखेड शहरात सिनेस्टाईल घटना आरोपीने पोलीसावर पिस्टल रोखले स्वसंरक्षणासाठी पोलीस निरीक्षकाचा आरोपीच्या पायावर गोळीबार तीन आरोपी अटक.. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांची धडाकेबाज कामगिरी

अहमदनगर दि. १९ जुलै (प्रतिनिधी) :- जामखेड शहरातील तपनेश्वर येथील कारचालकाला डोक्याला पिस्टल लावून कार पळवली सदर माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी शोधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना खर्डा रस्त्यावर एका हॉटेल समोर तीन आरोपी बसलेले दिसले पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताना झटापट झाली यामध्ये दोन पोलीस किरकोळ जखमी झाले यादरम्यान एका आरोपीने पिस्टलमधून पोलीसावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी स्वसंरक्षणासाठी आरोपीच्या पायावर गोळीबार करून तीनही आरोपी ताब्यात घेतले व जखमी आरोपीला नगर येथील सिव्हिल हॉस्पिटलला उपचारासाठी रवाना केले. याप्रकरणी पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.

जामखेड पोलीसात पोलीस कॉन्स्टेबल संतोष नामदेव कोपनर यांनी फिर्याद दिली की, दिनांक 19 रोजी 00/10 वा. चे सुमारास आरोपीत प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार, शुभम बाळासाहेब पवार, काकासाहेब उत्तम डुने सर्व (रा. सारोळा ता. जामखेड) यानी जामखेड शहरातील तपनेश्वर रोड येथे इसम नामे अदनान जहर शेख, (रा. तपश्वररोड, जामखेड ता. जामखेड) यांचे डोक्याला पिस्टल लावुन त्याच्या ताब्यातील इटींगा गाडी क्रमांक (एमएच 12 केटी 4795) हि जबरीने चोरून नेलेली असलेने आम्ही आरोपीत इसम नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार, शुभम बाळासाहेब पवार व काकासाहेब उत्तम् डुचे यांचा शोध घेवून आमचे सरकारी काम करीत असताना जामखेड ते खर्डा असे जाणारे रोडलगत असलेले हॉटेल साई समोरील मोकळ्या पटांगणात आरोपी नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमत पवार याने त्याचे कमरेला असलेल पिस्टल बाहेर काढुन आम्हाला जिवे ठार मारण्याचे उददेशाने त्याचे हातातील पिस्टल आमच्या दिशेने रोखुन, पिस्टलचे ट्रिगर दाबुन आमच्यावर गोळी फायर करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे पिस्टल मधील गोळी फायर झाली नाही, त्याचे वेळी आमचे पथकातील पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आरोपीत नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार व त्याचे साथीदार यांना ” तुझ्या हातातील पिस्टल खाली टाक, तुम्ही तिघेही सरेंडर करा” असे आवाहन करुन देखील आरोपीत यांनी त्यांचेकडील पिस्टल मधुन फायर करण्याचे उददेशाने पिस्टल पुन्हा कॉक करण्याचा प्रयत्न करुन तसेच आमचेशी झटापट व आम्हाला मारहाण केली. त्याच प्रमाणे आम्ही करीत असलेले सरकारी कामात अडथळा आणुन आम्हाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेला आहे.

सदर वेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आमचे सर्वाचे स्वसंरक्षनार्थ आरोपी इसम नामे प्रताप ऊर्फ बाळा हनुमंत पवार याचे दिशेने झाडलेली गोळी त्याचे उजवे पायाचे पंजावर लागुन तो जखमी झालेला आहे. पोलीसांनी वरील सर्व तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचे विरुध्द भा.द.वि. कलम 307, 353, 332, 34 तसेच भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3/25 व 28 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे