कौतुकास्पद

डॉ.विशाल पांडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठच्या अधिष्ठाता पदी निवड! डॉ. विशाल पांडे यांच्या निवडीने आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातल्या व्यक्तीची पहिल्यांदाच मोठ्या पदावर निवड डॉ.पांडे हे नक्कीच भविष्यात उज्वल कामगिरी करतील – अॅड शिवाजीराव काकडे राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला डॉ. पांडे यांचा सन्मान

अहमदनगर दि. 8 जानेवारी (प्रतिनिधी )- शहरातील आनंद धाम समोरील राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या एन एन सथ्था महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल पांडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठच्या अधिष्ठाता पदी निवड झाली. निवड झाल्याने अहमदनगर जिल्ह्याला पहिल्यांदाच असा बहुमान मिळाला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ लोणेरे च्या फार्मसी विभागाचे अधिष्ठाता या पदाचा कार्यभार दिनांक 1 जानेवारी 2024 सोपवण्यात आला . त्यांनी आज विद्यापीठाचा कार्यभार स्वीकारला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठच्या अधिष्ठाता पदी निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या वतीने अभिष्टचिंतन सन्मान सोहळा आयोजित साजरा करण्यात आला होता.
राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड शिवाजीराव काकडे व संस्थेचे विश्वस्त डॉ.मेहरनोश
मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड शिवाजीराव काकडे यांच्या शुभहस्ते डॉ विशाल पांडे यांचा सत्कार व गौरव करण्यात आला. यावेळी शिवाजीराव काकडे यांनी केलेल्या मार्गदर्शन पर भाषणात त्यांनी डॉ. पांडे यांनी सर्व समावेशक व समाजातील सर्व स्तरांना समावून घेत, संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विस्तारित विद्यापीठाच्या व फार्मसी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या कार्यप्रणालीचा वापर करून त्यांना मिळालेल्या पदाचा व आपल्या महाविद्यालयाला मिळालेल्या संधीची संधीचा योग्य न्याय देऊन वापर करावा अशी इच्छा व्यक्त केली व
डॉ. विशाल पांडे यांच्या निवडीने आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातल्या व्यक्तीची पहिल्यांदाच अशा शैक्षणिक क्षेत्राच्या मोठ्या पदावर निवड झाल्याने मनस्वी आनंद व संस्थेचा गौरव आहे डॉ.पांडे हे भविष्यात नक्कीच आणखी मोठ्या पदापर्यंत पोहोचतील असे मनोगत- अॅड शिवाजीराव काकडे यांनी व्यक्त केले.
डॉ.मेहरनोश मेहता यांनी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले त्यामध्ये असे म्हणाले की महाविद्यालयांमध्ये विविध स्तरांवर व सातत्याने विज्ञान प्रदर्शने व इतर प्रायोगिक प्रकल्प आयोजित करण्यावर मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ विशाल पांडे यांनी आभार मानले व मिळालेल्या पदाचा सुयोग्य वापर करून विद्यापीठ व व फार्मसी विभागात ची प्रगती करण्याचे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रीय पाठशाळा हायस्कूलचे मुख्याध्यापक जगन्नाथ बोडखे उपस्थित होते.
यावेळी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाच्या राष्ट्रीय शिक्षण मंडळाचे विविध महाविद्यालयांचे व शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य व शिक्षक वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वैभव वाघ यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे