अहमदनगर दि.26 डिसेंबर (प्रतिनिधी ) घोडेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सनी खंडागळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार तसेच नाशिक विभागीय अध्यक्ष शरद तांबे यांच्या सूचनेनुसार सनी खंडागळे यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या नेवासा तालुका उपअध्यक्षपदी निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीचे पत्र पुणे येथील जेष्ठ कवी अण्णाजी धगाटे,भ्रष्टाचार जन आंदोलनाचे जिल्हा अध्यक्ष अरुण खिची,युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा प्रमुख मार्गदर्शक कनींगद्वज सर, प्रा. राम आडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी ग्रामीण युवा पत्रकार संघांचे जिल्हा अध्यक्ष महेश भोसले, जिल्हा उपअध्यक्ष उमेश साठे, जिल्हा सचिव बाळकृष्ण भोसले, नगर तालुका कार्याध्यक्ष संदीप शिंदे, नगर शहर अध्यक्ष, अशोक तांबे, सुहास हिवाळे,अर्जुन पाडळे यांनी खंडागळे यांना त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा