वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या जागतिक बौद्ध संघटनेच्या निमंत्रणामुळे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आजपासून बँकॉक दौऱ्यावर
भारतीय बौद्ध नेते म्हणून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा बँकॉक मधील जागतिक बौद्ध धम्म परिषदेत होणार सन्मान

मुंबई दि. 20 नोव्हेंबर – रिपब्लिकन पक्षाचे रष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी भारतात दलित बहुजन गरीब शोषित वर्गासाठी केलेल्या भरीव कार्यामुळे तसेच भारतात बौद्ध धम्म साठी आणि बौद्ध जनतेसाठी ते सतत काम करीत असल्यामुळे बौद्ध नेते म्हणून ही त्यांचे योगदान चांगले असल्याची दखल प्रमुख जागतिक बौद्ध संघटना असलेल्या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट ने घेतली आहे. बँकॉक येथे वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या जागतिक बौद्ध संघटनेची जागतिक कार्यकारी परिषद येत्या दि.21 ते 23 नोव्हेंबर पर्यंत बँकॉक ला आयोजित करण्यात आली असून या धम्म परिषदेत ना.रामदास आठवले यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट या जागतिक बौद्ध धम्म संघटनेच्या ऑनररी व्हाईस प्रेसिडेंट ( मानद उपाध्यक्ष ) पदी कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात येणार आहे. या जागतीक धम्म परिषदेत उपस्थित राहण्यासाठी ना.रामदास आठवले आज सोमवार दि.20 नोव्हेंबर रोजी सकाळी बँकॉकला रवाना होणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे दि.20 नोव्हेंम्बर ते 25 नोव्हेंबर असे 5 दिवस बँकॉक दौऱ्यावर असून त्यांच्या सोबत युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशन चे अध्यक्ष अविनाश कांबळे आहेत.
वर्ल्ड फेलीशीप ऑफ बुद्धिस्टचे अध्यक्ष फेलेप थियरी यांनी रिपब्लिकन पक्षा चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे भारतातील काम खूप मोठे आहे. जागतिक स्तरावर ना.रामदास आठवले यांचे काम आहे. त्यांच्या नेतृत्वाची वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट ला गरज आहे. त्यामुळे वर्ल्ड फेलीशीप ऑफ बुद्धिस्ट च्या ऑनरारी मानद उपाध्यक्ष पदी ना.रामदास आठवले यांची निवड करीत असल्याचे सांगितले आहे.
वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट च्या जागतिक कार्यकारी परिषदेत जगभरातील 60 बौद्ध देशांचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या 60 देशांच्या बौद्ध प्रतिनिधींच्या उपस्थितीत वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट च्या जागतिक मानद उपाध्यक्ष पदी ना.रामदास आठवले यांचे निवड करून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
जगभरात निर्माण होणारी युद्धजन्य स्थितीतुन जग कसे शांती च्या मार्गवर जाईल; बुद्ध विचार शांती अहिंसा मानवता सत्य समता या विचारांचा प्रसार करून जगभर मानव जातीच्या कल्याणासाठी बौद्ध धम्माचा प्रसार वाढवावा याबाबत ही या आंतराष्ट्रीय बौद्ध परिषदेत विचार विनिमय होणार आहे. या जागतिक बौद्ध संघटनेच्या उपाध्यक्ष पदी या पूर्वींही ना.रामदास आठवले यांची निवड झाली होती. जागतिक उपाध्यक्षपदाचा कार्यकाळ हा 4 वर्षांचा असतो.मात्र यंदा ना.रामदास आठवले यांना वर्ल्ड फेलीशीप ऑफ बुद्धिस्ट चे जागतिक मानद उपाध्यक्ष पदाचा बहुमान देण्यात येणार असून त्या पदासाठी कोणतीही काल मर्यादा ठेवण्यात येणार नाही. येत्या दि.20 नोव्हेम्बरला बँकॉक ला रवाना झाल्यानंतर ना.रामदास आठवले 25 नोव्हेम्बर रोजी भारतात परतणार आहेत अशी माहिती त्यांच्या सोबत बँकॉक ला प्रवास करणारे युनायटेड बुद्धिस्ट फेडरेशन चे अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी दिली आहे.