गुन्हेगारी

अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करा: पोलिस मित्राने सुरू केले उपोषण

न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सख्ख्या भावांच्या भांडणात अदखलपात्र गुन्ह्यावरुन बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर चार पोलीस सहकारी कर्मचारी यांनी कारण नसताना शिवीगाळ करून अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप करीत पोलीस मित्र नवनाथ बबन मोरे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालया समोर या प्रकरणी चौकशी करुन मारहाण करणारे पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर चार पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यासाठी उपोषण केले. या प्रकरणी कारवाई होत नाही, तो पर्यंत उपोषण सुरु ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
एरंडोली (ता. श्रीगोंदा) येथील रहिवासी असलेले नवनाथ बबन मोरे सन 2011 पासून पोलीस मित्र म्हणून गावात काम पाहत आहे. त्यांचा सख्खा भाऊ छगन मोरे यांच्या शाब्दिक भांडण झाले होते. यावरुन बेलवंडी पोलीस स्टेशनला 7 फेब्रुवारी रोजी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. त्यानंतर 8 फेब्रुवारी दुपारी 4 वाजता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी फोन करून पोलीस स्टेशनला बोलावण्यासाठी फोन केला. त्यांना कामावर असल्याने उशीर लागणार असल्याचे सांगताच त्यांनी दमदाटी सुरु केली. हातातले काम सोडून लगेच आई व पत्नीला घेऊन पोलीस स्टेशनला संध्याकाळी 7 वाजता पोहचले. पोलीस स्टेशन बाहेर उभे असलेले पोलीस निरीक्षकांनी कुठलीशी चौकशी न करता मारहाण करण्यास सुरुवात केली. अंगातील कपडे काढून पत्नी व आईच्या समक्ष पोलीस निरीक्षक व पोलीस स्टेशन मधील चार पोलिस कर्मचार्‍यांनी जबर मारहाण केल्याचा आरोप नवनाथ बबन मोरे यांनी केला आहे.
त्यानंतर तक्रारदार भावाला माझ्या विरोधात मोठे कलम लावण्यासाठी फोन लावून बोलावले. भावाने
पोलीस स्टेशनला येऊन कालच तक्रार दिली, आम्हाला काही तक्रार द्यायची नसल्याचे सांगितले. मात्र पोलिस निरीक्षकांनी त्यांना खोट्या तक्रारी करतो म्हणून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. यानंतर भाऊजई तक्रार देण्यास तयार झाली व पोलिस निरीक्षकांच्या सांगण्यावरुन फिर्याद घेण्यात आल्याचे निवेदनात म्हंटले आहे. याप्रकरणी पोलीस स्टेशनचे सीसीटीव्ही फुटेजचे रेकॉर्डिंग ताब्यात घ्यावे, याप्रकरणी सखोल चौकशी करावी, अदखलपात्र गुन्ह्यावरुन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व इतर चार पोलीस सहकारी कर्मचारी यांनी जबर मारहाण केल्याप्रकरणी त्यांचे निलंबन करण्याची मागणी पोलिस मित्र असलेले नवनाथ बबन मोरे यांनी केली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे