गुटखा व सुगंधीत तंबाखुची अवैधरित्या साठा करुन विक्री करणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई

अहमदनगर दि.7 नोव्हेंबर (प्रतिनिधी)
श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, पोना/गणेश भिंगारदे व ज्ञानेश्वर शिंदे अशा पोलीस अधिकारी व अंमलदारांचे पथक नेमून महाराष्ट्र राज्यात विक्री प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाला व सुगंधीत तंबाखु विरुध्द कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. नमुद आदेशान्वये पथक माहिती घेताना दि.06/11/23 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे रमीज इक्बाल मेमन रा. दशमेश नगर, श्रीरामपूर याने त्याचे राहते घराचे खोलीत गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखुचा साठा केला असुन त्याची चोरटी विक्री करीत आहे. आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने, पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.
पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन पाहाणी करता एक इसम घराजवळ संशयीतरित्या उभा असलेला दिसला पथकाची खात्री होताच संशयीतास ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्यास संशयीतास पोलीस पथकाची ओळख सांगुन, त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) रमीज इक्बाल मेमन वय 21, रा. दशमेश नगर, जुनी महाराष्ट्र बॅके मागे, श्रीरामपूर असे असल्याचे सांगितले. पथकाने संशयीतास झडतीचा उद्देश कळविताच संशयीताने सदर घराची बंद रुम उघडली त्यावेळी रुमची झडती घेतली असता त्याचे कब्जात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला विमल पानमसाला, हिरा पानमसाला व तंबाखु मिळुन आली. त्याबाबत आरोपींकडे विचारपुस करता त्यांनी सदर माल हा त्याचे मालकीचा असुन विक्री करण्याचे उद्देशाने साठवुन ठेवला आहे अशी माहिती दिल्याने आरोपीस महाराष्ट्र राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा पानमसाला व सुंगधीत तंबाखु असा एकुण 18,600/- रुपये किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 1176/23 भादविक 328, 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. डॉ. श्री. बसवराज शिवपुजे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.