शिवसेना नगरसेविका शांताबाई शिंदेंच्या प्रयत्नातून उद्यान व ओपन स्पेसला वॉल कम्पौंड नवीन विकासकामांमुळे उपनगरांची विकासाकडे वाटचाल – महापौर रोहिणीताई शेंडगे

नगर (प्रतिनिधी) – प्रभागाचा कायापालट होण्यासाठी लोकप्रतिनिधीचा जनसंवाद गरजेचा आहे. आमचे लोकप्रतिनिधी प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे प्रभागातील जुन्या व नव्या नागरी वसाहतीतील समस्या लक्षात येतात. जुन्या भागातील समस्यांचा निपटारा करून नव्या वसाहतीतील समस्या नवीन विकासकामांना मंजुरी देत मार्गी लावल्या जाताहेत. त्यामुळे सर्वांना पायाभूत सुविधा मिळण्यातील अडचणी दूर होत आहेत. शिवसेनेने नियोजनबद्ध विकासकामे हाती घेतल्याने उपनगरांचा झपाट्याने विकास झालेला दिसून येतो. उपनगरांच्या विकासकामांसाठी शिवसेना कटिबद्ध आहे. शिवसेना नगरसेविका शांताबाई शिंदे यांच्या प्रयत्नातून उद्यान विकसित करून ओपन स्पेेसला वॉल कम्पौंड टाकण्यात येत असून, त्यामुळे प्रभागातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाल्याचे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी नवीन गावठाण केडगाव येथे उद्यान करणे व ओपन स्पेस वॉल कम्पौंड कामाच्या शुभारंंभप्रसंगी केले.
कार्यक्रमाचा शुभारंभ महापौर शेंडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नगरसेविका शांताबाई शिंदे, नगरसेवक अमोल येवले, शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, संग्राम कोतकर, बबलू शिंदे, मुकेश जोशी, दिलीप जगधने सर, संतोष देशमाने, अक्षय शिंदे, सार्थक जगधने, संकेत जगधने, सुमेध चव्हाण, माऊली पवार, अर्सनाल शेख, अरमान शेख, विमला शिंदे, शुभांगी देशमाने, आशा जगधने, लता चव्हाण, यशोदा झरेकर, फर्जना शेख, फर्जना पठाण, सुरेखा पोखरणा, सुमन गुंदेचा, इंदुबाई पवार, सुमन पाचारणे, अलका पवार, बेबीताई जाधव, रतनबाई गायकवाड, मंदाबाई कांबळे यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक उपस्थित होते.
महापौर शेंडगे पुढे म्हणाल्या की, उपनगर झपाट्याने वाढत असून, यात प्रामुख्याने सावेडी व केडगाव उपनगरांचा विकास साधण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून होत आहे. यामुळे येथील नागरिकांना सोयीसुविधा मिळत आहेत. आम्ही कामात कधीच राजकारण करत नाही. विकासकामांसाठी शिवसेना कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवसेना नगरसेविका शांताबाई शिंदे म्हणाल्या की, शिवसेनेच्या माध्यमातून संधी मिळाल्यापासून प्रभागात अनेक विकासकामे हाती घेतली. काही पूर्णत्वाकडे आहेत, तर काही लोकार्पितदेखील केली आहेत. नवीन गावठाणमधील नागरिकांनी येथे उद्यान विकसित करून ओपन स्पेसला वॉल कम्पौंड टाकण्याची केलेली मागणी निधी उपलब्ध होताच पूर्णत्वास नेली आहे. शिवसेना नगरसेवक प्रभागांत रखडलेली कामे मार्गी लावत असून, विकासकामांद्वारे प्रभागाचं रुपडं पालटत असल्याचे सांगितले.
यावेळी नगरसेवक अमोल येवले, दिलीप सातपुते, संग्राम कोतकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप जगधने सर यांनी केले, बाळासाहेब शिंदे यांनी आभार मानले.