कौतुकास्पद
ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत कोतवाली पोलिसांनी लावला अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध आरोपीस ठोकल्या बेडया

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 19 मे : ऑपरेशन मुस्कान अभियाना अंतर्गत कोतवाली पोलिसांना अपहरण केलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध लावण्यात यश आले आहे.
![]()
सविस्तर माहिती अशी की कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील एका अल्पवयीन मुलगी वय 17 वर्ष ही दि.18/04/2026 रोजी सकाळी 6:00 वाजेच्या सुमारास संशयित आरोपी प्रदीप उर्फ व व्हन्या परशुराम इजगत राहणार रेल्वे स्टेशन बोहरी चाळ, अहिल्याननगर याने सदर मुलीचे अपहरण केलेबाबत मुलीच्या पालकांनी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 289/2026 BNS 137(2) प्रमाणे दाखल केला होता.
सदर संशयित आरोपीने सदर मुलगी हिची अपहरण करून घेऊ गेल्यानंतर त्याचा बराच शोध घेतला असता तो व अल्पवयीन मुलगी ही मिळून येत नव्हते. सदर मुलगी व आरोपी हे पुणे शहरात वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत असले बाबत. कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गोपनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाल्याने त्यांनी सदर माहिती तपासी अधिकारी प्रवीण पाटील यांना कळवल्याने
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील ,महिला पोलीस कॉन्स्टेबल श्वेता परमासागर,पोलीस कॉन्स्टेबल याकूब सय्यद, अमोल गाडे, यांचे पथक तयार करून पुणे येथे रवाना केले. तेथील बातमी प्रमाणे सदर पथकाने वानवडी पोलीस स्टेशनचे पोलीस यांची मदत घेऊन सादर बातमीप्रमाणे बारकाईने तपास करून सलग 36 तास सदर अल्पवयीन मुलगी व आरोपी यांचा तांत्रिक विश्लेषण करून शोध घेतला असता अखेर सदर अल्पवयीन मुलगी व आरोपी हे मिळून आले त्यावरून त्यांना ताब्यात घेऊन कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेऊन येऊन सदर आरोपी यास सदर गुन्ह्यात अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत आहेत.
सदर कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक माननीय मुम्मका सुदर्शन , अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग डाॅ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल श्वेता परमासागर, पोलीस कॉन्स्टेबल याकूब सय्यद,अमोल गाडे, दक्षिण मोबाईल सेल चे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू व नितीन शिंदे यांनी केली आहे.



