ब्रेकिंग

पै अनिल जाधव ठरला “राजमुद्रा केसरी” चा मानकरी

कर्जत( प्रतिनिधी) : दि. २१ एप्रिल
कै भास्करदादा तोरडमल आणि कै पै दिलीपनाना तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिमित राजमुद्रा ग्रुपच्यावतीने कुस्ती मैदान घेण्यात आले. यात मानाच्या “राजमुद्रा केसरी” किताबी कुस्तीसाठी करमाळयाचा पै अनिल जाधव याने लपेट डावावर कर्जतच्या विक्रम शेटेला अवघ्या एक मिनिटाच्या आत अस्मान दाखवित राजमुद्रा केसरीवर आपले नाव कोरले. कर्जत शहर आणि तालुका परिसरातील कुस्ती शौकिनांना मैदानात चित्तथरारक कुस्ती लढती पहावयास मिळाल्या. या कुस्ती मैदानाला प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी भेट देत आयोजकांचे कौतुक केले.
कै भास्करदादा तोरडमल आणि कै पै दिलीपनाना तोरडमल यांच्या पुण्यतिथीनिमित राजमुद्रा ग्रुपच्यावतीने बुधवार, दि २० एप्रिल रोजी “राजमुद्रा केसरी” कुस्ती मैदान संपन्न झाले. या मैदानाचे उदघाटन सर्व सामाजिक संघटनेच्या सर्व श्रमप्रेमीच्या हस्ते करण्यात आले. राजमुद्रा केसरी किताबी कुस्तीमध्ये करमाळयाचा अनिल जाधवने कर्जतच्या विक्रम शेटेवर मात करीत राजमुद्रा केसरी-२०२२वर आपले नाव कोरले.या कुस्तीला पंच म्हणून पै प्रवीण घुले यांनी काम पाहिले. पै जाधव यास १ लाख ११ हजार १११ रुपयांचे इनाम आणि अड सुमित पाटील यांच्याकडून मानाची गदा
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यासह क्रमांक दोन कुस्ती भरत म्हस्के आणि किरण पांडुळे यांनी बरोबरीत सोडवली. तर तृतीय क्रमांकासाठी राजमुद्राचे अध्यक्ष विजय तोरडमल यांचा पठ्ठा पै विकास तोरडमलने जामखेडच्या कृष्णा कराळेला दुहेरी पटावर अस्मान दाखवत विजय मिळवला. कै दिलीपनाना तोरडमल क्रीडा संकुलातील पै अजय नेटके, रवी काळे, हर्षल पठाडे, गौरव सौताडे, धुळाजी इरकर, विजय परदेशी, प्रथमेश जाधव, विलास हाके, रंगनाथ देवकर, प्रथमेश मुळीक, आदेश सुपेकर,शार्दूल ननवरे, समाधान कोरे यांनी विशेष खेळ करीत चित्तथरारक लढतीमध्ये यश मिळवले. यासर्व कुस्त्यासाठी पंच म्हणून पै प्रवीण घुले, शामभाऊ कानगुडे, साबळे वस्ताद, अनिल जगदाळे, काका शेळके, युवराज शेळके, बंडा मोढळे, पप्पू मोढळे, सुधीर काळे, पिंटू दंडे, विलास धांडे, कालिदास गावडे, विनोद मुरकुटे, हरी मुरकुटे, गणेश शेळके, राहुल मांडगे, वैभव पवार, भाऊसाहेब तोरडमल, शिवाजी चोरमले, प्रसाद कानगुडे, आप्पा काळे, ऋषिकेश धांडे आदींनी काम पाहिले. कुस्ती मैदान यशस्वीतेसाठी राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष विजयकुमार तोरडमल यांच्यासह वस्ताद ईश्वर तोरडमल, सचिन जाधव, राजू लाळगे, आप्पू लाळगे, अशोक तोरडमल, मोटा पठाडे, सुनील साळुंके, दादा खोडवे, शेखर पठाडे, विकास कदम, प्रकाश वांगणे, बापूराव तोरडमल, नवनाथ लष्कर आणि त्यांच्या सर्व सहकार्यानी विशेष परिश्रम घेतले.

****** मैदानासाठी सर्वाचे आभार आणि धन्यवाद – अध्यक्ष विजय तोरडमल
“राजमुद्रा केसरी” मैदानात प्रेक्षणीय कुस्त्या क्रीडाप्रेमींना पहावयास मिळाल्या. या मैदानासाठी तुषार काकडे, सचिन कुलथे, अतुल राजेजाधव, शंकरशेठ नेवसे, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, दिलीप भोज, किरण पाटील, सतीश खेतमाळस, जी एम इलेव्हन मित्रपरिवार, टी जी कंपनी मित्रपरिवार आणि कै भास्करदादा व कै दिलीपनाना यांच्यावर विशेष प्रेम करणाऱ्यानी विशेष सहकार्य करीत मैदान यशस्वी केले. यासह परिसरातील ज्ञात-अज्ञात क्रीडा प्रेमी आणि मित्रपरिवाराचे आभार राजमुद्रा ग्रुपचे अध्यक्ष विजयकुमार तोरडमल यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे