अहमदनगर शहरामधील महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण फिरणारे 22 टवाळखोर मुलांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर दि.12 ऑक्टोबर (प्रतिनिधी )
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, अहमदनगर शहरामधील महाविद्यालय परिसरामध्ये टवाळखोर मुले विनाकारण जमुन महाविद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी व विद्यार्थीनींना त्रास होईल असे वर्तन करीत असलेबाबत मा. श्री राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर व स्थानिक गुन्हे शाखेकडे तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या.
त्या अनुषंगाने पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/गणेश वारुळे, हेमंत थोरात, सफौ. राजेंद्र वाघ, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, विजय वेठेकर, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, पोना/विशाल दळवी, लक्ष्मण खोकले, भिमराज खर्से, संदीप चव्हाण, पोकॉ/सागर ससाणे, चालक पोकॉ/अरुण मोरे असे अधिकारी व पोलीस अंमलदार यांना अहमदनगर शहरामधील महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण फिरणारे टवाळखोर मुलांविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देवुन रवाना केले होते.
पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार अशांनी अहमदनगर शहरातील न्यु आर्ट ऍ़ण्ड सायन्स कॉलेज अहमदनगर, पेमराज सारडा महाविद्यालय परिसरामध्ये पेट्रोलिंग करुन महाविद्यालयाचे परिसरामध्ये विनाकारण फिरणारे व महाविद्यालयामध्ये येणारे विद्यार्थी व विद्यार्थीनींना त्रास होईल असे वर्तन करणारे एकुण 22 मुलांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाहीकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर आहे. सदर मिळुन आलेल्या मुलांविरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली असुन सदर मुलांना व त्यांचे पालकांना याबाबत समज देण्यात आली आहे.
अहमदनगर शहरामध्ये लहान मुलांचे किरकोळ भांडणातुन घडणारे शरिराविरुध्दचे गंभीर स्वरुपाचे गुन्ह्यांना प्रतिबंध करणेकरीता तसेच महाविद्यालयामध्ये येणारे – जाणारे विद्यार्थी व विद्यार्थीनी यांचे सुरक्षेकरीता यापुढेही अहमदनगर शहरामधील महाविद्यालय, विद्यालये, शाळा परिसरामध्ये स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मार्फतीने पेट्रोलिंग करुन महाविद्यालय परिसरामध्ये विनाकारण फिरणारे टवाळखोर मुलांवर कारवाई करण्यात येणार आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्री अनिल कातकाडे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग, यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.