सामाजिक
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दगडवाडी कौडाने ग्रामस्थांच्या वतीने विनम्र अभिवादन!

कौडाने दिनांक ६ डिसेंबर (प्रतिनिधी ) कर्जत तालुक्यातील दगडवाडी कौडाने एथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम कौडाणे दगडवाडी समाज मंदिर येथे करण्यात आला. यावेळी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार व दीप प्रज्वलन करून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माननीय नितीनजी गंगावणे यांनी संबोधन केले. व माजी शिक्षक गौतमजी गंगावणे यांनी आंबेडकरांविषयी व संविधानाविषयी नागरिकांना महत्त्व पटवून दिले यावेळी या कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.