पाथर्डी तालुक्यातील तनपुरवाडी परिसरात चोरांचा धुमाकूळ

प्रतिनिधी( वजीर शेख)
पाथर्डी तालुक्यालगत तनपुरवाडी
गावात चोरट्यांचा धुमाकूळ. दिनांक. 24/ 5 /2022 रोजी रात्री 12 च्या सुमारास चोरट्यांनी गावातून एक दुचाकी व एका घरातून रोख रक्कम लंपास केली. युवक काँग्रेस हेचे शहराध्यक्ष दत्ता पाठक यांनी समयसूचकता दाखवत सदर घटनेचा तपशील पाथर्डी तालुक्याचे PI चव्हाण साहेब यांना फोनवरून कळवला. सविस्तर वृत्त असे की ,
घटनेच्या रात्री 12 च्या सुमारास चोरट्यांनी गावात प्रवेश करत गावातील 2 दुचाक्या व एका घरातील काही रोख रक्कम लंपास केली , त्याचबरोबर युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष दत्ता पाठक यांची दुचाकी बुलेट चोरण्याचाही प्रयत्न केला गेला परंतु चोरट्यांचा प्रयत्न फेल ठरला आणि त्याचा परिणाम असा की दत्ता पाठक यांची दुचाकी चोरी होण्यापासून तर वाचलीच त्याचबरोबर बाहेर गावातून चोरलेली एक दुचाकी चोरट्यांना तिथेच सोडून पळ काढावा लागला आणि चोरट्यांचा तो कट जमीनदोस्त झाला
दुसऱ्या दिवशी सकाळी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता दत्ता पाठक यांनी गावकऱ्यांसमवेत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती दिली. सदर घटनेची माहिती कळताच PI सुहास चव्हाण यांनी संदिप खांडे व हेडकॉन्स्टेबल वैद्य यांना घटनास्थळी पाठवत पंचनामा केला.