माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था भिंगारच्या वतीने श्रीनिवास बोज्जा यांचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी) – प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल चे संस्थापक श्रीनिवास बोज्जा यांना आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत, दिल्ली सरकारच्या ओबिसी आयोगाकडून ” *राष्ट्रीय एकता पुरस्कार”* भारताची राजधानी दिल्लीतील कॉस्टिस्टुशन क्लब मध्ये देण्यात आला म्हणून
माजी सैनिक बहुउद्देशीय संस्था भिंगार अहमदनगर यांच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामदासजी गुंड यांच्या हस्ते शाल ,फेटा ,हार, श्रीफळ देऊन त्यांचा संस्थेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष संजय वाघ, कार्याध्यक्ष संजू ढाकणे, सचिव कॅप्टन शेख सिकंदर खजिनदार फरताडे बापू सह खजिनदार कुंडलिक ढाकणे संस्थेचे नवीन मेंबर पोपट दहिफळे आदी उपस्थित होते.
या वेळी प्रस्तविक मेजर कुंडलिक ढाकणे यांनो करतांना श्रीनिवास बोज्जा यांच्या बाबत माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष रामदास गुंड यांनी संस्थे बाबत माहिती देऊन चांगले कार्य करणाऱ्यांच्या पाठीशी संस्था असून बोज्जा यांचे कार्य अलोकिक असल्यामुळेच त्यांना दिल्ली चा पुरस्कार मिळाला.
या वेळी सत्काराला उत्तर देतांना बोज्जा म्हणाले मला नेहमीच सैनिकांचा अभिमान आहे. माजी सैनिकांनी केलेला सन्मान हा माझ्यासाठी फार महत्वाचं असून मी आपल्या संस्थेसाठी सर्वतोपारी सहकार्य करेल असे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅप्टन शेख सिकंदर यांनी केले तर आभार संजय वाघ यांनी मानले.