संगमनेर येथे दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दिव्यांगांना स्पर्धेत सहभागी होण्याचे समाजकल्याण विभागाचे आवाहन
अहमदनगर, १९ डिसेंबर – दिव्यांग मुला-मुलींचे जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे २१ व २२ डिसेंबर रोजी संगमनेर येथे आयोजन करण्यात आले आहे. सर्वसामान्य शाळेतील दिव्यांग विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकतात. यासाठी नाव नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
जिल्हा परिषद जिल्हा समाजकल्याण अधिकारी, संग्राम निवासी मुकबधिर विद्यालय आणि संगमनेरच्या डॉ. देवेंद्र ओहरा निवासी मतिमंद विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. जागतिक दिव्यांग दिन ३ डिसेंबरचे औचित्य साधून या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन २१ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ७ वाजता संगमनेर येथील कवि अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे होणार आहे. २२ डिसेंबर २०२२ रोजी नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर कॉलेजमध्ये या स्पर्धा होणार आहेत.
सर्वसामान्य शाळेतील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांनी या जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धामध्ये सहभाग घ्यावा. शाळेतील मुख्याध्यापक यांचेमार्फत प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांचे नावे सोमनाथ अल्ले, सामाजिक कार्यकर्ता – मो.नं ९३७०७७०७५५ यांच्याकडे नोंदवावीत. असे आवाहनही श्री. देवढे यांनी केले आहे.