आय लव्ह सिध्दीबागेमध्ये प्रेमी युगलांचा सुळसुळाट!

अहमदनगर (प्रतिनिधी) आय लव्ह सिध्दीबाग अर्थात कै. बाळासाहेब देशपांडे उद्यान व आताचे आय लव्ह सिध्दीबाग होय. पूर्वीच्या कै. बाळासाहेब देशपांडे उद्यानाने कात टाकत आय लव्ह सिध्दीबाग या नवीन नावाने नगर शहरातील वैभवात भर टाकली.यामाध्यमातून या उद्यानाचे सुंदर असे सुशोभीकरण करण्यात आले.परंतु आय लव्ह सिध्दीबागेचे हे सुंदरीकरन हळूहळू कमी होत असल्याची माहिती समोर येत आहे.
आय लव्ह सिध्दीबागेमध्ये कॉलेज तरुण,तरुणी दिवसभर गळ्यात गळे घालून बसण्याचा अड्डा बनत असल्याची माहिती समोर आली आहे. ठेकेदारी पद्धतीने आय लव्ह सिध्दीबाग उदयास आले. हे करण्यामागचा हेतू सुंदरच होता.पण आता आय लव्ह सिध्दीबागेमध्ये प्रेमी युगलांचा सुळसुळाट होत आहे.हे वास्तव निश्चितच या सुंदर उद्यानाला गालबोट लावत आहे.
याठिकाणी सकाळपासून प्रेमी युगल बसून नको ते चाळे करत असल्यामुळे शहरातील नागरिकांना उद्यानात जायची इच्छा होत नाही.या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.प्रेमी युगलांचा उद्यानातील सुळसुळाट बंद होण्यासाठी पोलीस दलातील “भरोसा सेल” ने याठिकाणी खाजगी वेशात चक्कर मारणे गरचेचे असल्याच्या चर्चा नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.प्रेमी युगलांचा उद्यानातील सुळसुळाट केंव्हा बंद होईल.याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया:
अहमदनगर शहरा मध्ये सर्वात जुनी अशी सिद्धिबाग आहे. आणि त्या मध्ये महानगर पालिका ने लक्ष द्यायला हवे होते. पण त्यांनी ठेकेदारी तत्वावर ते चालवायला दिले आहे. पण त्यांनी त्या मध्ये लक्ष द्यायला हवे .दिवाळी सुट्टी तसेच ते नवीन पुन्हा एकदा चालू झाले असल्यामुळे किती तरी कुटुंब आपल्या लहान लेकरा समवेत येत आहे. पण इथे प्रेमी युगलानचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिक परिवारासह येण्यास धजावत नाहीत.जे चालवितात त्यांनी तिथे जातीने लक्ष घालावे अथवा पोलिस प्रशासन ने लक्ष घालावे नाही तर नाइलाजास्तव सर्व प्रकारची तक्रार महापालिकेचे आयुक्त साहेब यांच्या कड़े करण्यात येईल.
सुमेध गायकवाड
जिल्हा अध्यक्ष (पीआरपी)