विशेष प्रशासकीय
राज्यातील पोलिस भरतीला स्थगिती!

मुंबई: संपूर्ण राज्यात होणाऱ्या पोलिस भरतीला स्थगिती मिळाली असल्याची माहिती मिळाली आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुमारे १७ हजार पदांच्या पोलिस भरतीला स्थगिती देण्यात आली आहे.
१ नोव्हेंबरपासून ही प्रकिया सुरू होणार होती. तथापि, प्रशासकीय कारणास्तव ती तूर्त स्थगित करण्यात आली आहे.
ही जाहिरात प्रसिध्द करण्यासंबंधीची तारीख नंतर कळविण्यात येणार आहे, असे पोलिस महासंचालक (प्रशिक्षणे व विशेष पथके) संजय कुमार यांनी कळविले आहे.
मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झालेली नव्हती. वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजन पोलीस भरतीसाठी पात्र नाहीत.
अशा तरुणांना संधी मिळावी, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये. त्यामुळे ही पोलीस भरती थोड्या कालावधीसाठी स्थगित करण्यात आल्याचं समिती आणि सरकारकडून कळतेय.