असोसिएशन च्या सन्मानाने आणखी काम करण्यास ऊर्जा मिळेल -श्रीनिवास बोज्जा फटाका असोसिएशन च्या वतीने श्रीनिवास बोज्जा यांचा सन्मान

नगर – दि ५ सप्टेंबर (प्रतिनिधी) अहमदनगर फटाका व्यापारी असोसिएशनच्या वतीने विश्व निर्मल फौंडेशन संस्थे अध्यक्ष व फटाका असो. चे सेक्रेटरी श्रीनिवास बोज्जा यांना दिल्ली सरकार चा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मिळाल्या बद्दल असो.चे अध्यक्ष सुरेश जाधव यांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी उपाध्यक्ष गजेंद्र राशीनकर, गणेश परभणे, सह सचिव अरविंद साठे, कार्याध्यक्ष शिवराम भगत, जेष्ठ सदस्य रामशेठ मुलतानी उपस्थित होते.
या वेळी सत्काराला उत्तर देतांना बोज्जा म्हणाले हा पुरस्कार माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. मी करीत असलेल्या कामाची पावती मला मिळाली आहे. असो. च्या वतीने जो माझा सन्मान केला जात आहे त्या मुळे मला या पुढेही आणखी काम करण्यास ऊर्जा मिळेल.
असो. चे अध्यक्ष सुरेश जाधव म्हणाले श्रीनिवास बोज्जा यांचे कार्य अष्टपैलू आहे, त्यांनी फटाका असोसिएशन मध्येच नव्हे तर सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रात एक चांगल्या कार्याचा ठसा उमठावलेला आहे. त्यांचे कार्याचा आपल्याला अभिमान आहे. या वेळी असो चे उपाध्यक्ष गजेंद्र राशीनकर यांनीही आपल्या मनोगतात बोज्जा यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे स्वागत अरविंद साठे यांनी केले तर आभार उमेश क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल तोडकर यांनी केले. कार्यक्रमांस असो चे जेष्ठ सदस्य शिरीष चंगेडे, देविदास ढवळे,अनिल टकले,सुनील गांधी, तसेच दाजी गारकर, सागर जाधव, सागर हरबा, विकास पटवेकर, रमेश बनकर, माणिक गाडळकर, कराळे, उबेद खान, मयूर भापकर, राजेंद्र छल्लाणी, विजय मुनोत आदी सभासद उपस्थित होते.