दलित महासंघाच्या जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी पत्रकार वजीरभाई शेख यांनी निवड

पाथर्डी (प्रतिनिधी )
दलित महासंघ ही जहाल संघटना आहे समाजातील वंचित ,पीडित घटकांना न्याय देण्यासाठी मा.प्रा.डॉ.मच्छिंद्रजी सकटे सर यांच्या नेतृत्वाखाली दलित महासंघ आक्रमक पणे रस्त्यावर उतरून आपल्या खास शैलीने संपूर्ण महाराष्ट्रात काम करत आहे, शासकीय विश्रामगृह येथे दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष मा.काशिनाथ सुलाखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मा,.वजीरभाई शेख यांनी दलित महासंघाच्या जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पदी निवड करण्यात आली तसेच पाथर्डी तालुका अध्यक्ष पदी आकाश कडूबाबा लोंढे आणि पाथर्डी तालुका कार्याध्यक्ष पदी शशिकांत नवगिरे यांची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष मा.संजय चांदणे तसेच आर.बी.रंधवे साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
या बैठकीस जिल्हा संपर्क प्रमुख मा. कडूबाबा लोंढे, जिल्हा कार्याध्यक्ष मा.लक्ष्मण बोरुडे ,श्रीगोंदा तालुकाध्यक्ष मा.चंद्रकांत सकट , मा.आशाताई सुलाखे पाटील ग्रामपंचायत सदस्य देऊळगाव सिद्धी, संगमनेर तालुकाध्यक्ष सुलोचना बहिरट, संगमनेर ता.उपाध्यक्ष मंदाकिनी मेंगाळ ,शेवगाव तालुकाध्यक्ष एकनाथ जगधने , प्रकाश कोळोखे ,विठ्ठल पाटोळे , दत्ता बर्डे ,भाऊसाहेब मधे संपत गुंड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.