सामाजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर वर तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल!

अहमदनगर ( प्रतिनिधी):-नगर शहरातील रेल्वेस्टेशन येथील कायनेटिक चौक परिसरातील एका पत्त्याच्या क्लबचा फेसबूक लाईव्ह करणारे सामजिक कार्यकर्ते संदीप भांबरकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अवैध धंदयांचे फेसबुक लाईव्ह केल्यामुळे त्यांना जबर मारहाण देखील करण्यात आली होती. त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबतची समजलेली माहिती अशी की,
एका महिलेने तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये संदीप भांबरकर यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.भांबरकर यांच्या विरुद्ध दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की घरात घुसून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे.तसेच सदरील महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरण्याचा प्रयत्न केल्याचं फिर्यादीत म्हटले आहे.संबंधित महिलेच्या फिर्यादी नुसार तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये संदीप भांबरकर यांच्या विरोधत भादविक.३९४,३५३ ब, ४५२,५०४,५०६,प्रमाणे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.