ब्रेकिंग

आज 60 उपकेंद्रावर महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा

परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर – दि.24 (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा, अराजपत्रित, गट-ब, संयुक्त (पूर्व) परीक्षा 2022 आज 26 फेब्रुवारी 2022 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील 60 उपकेंद्रावर सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळेत घेण्यात येणार आहे. असे परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या परिक्षेसाठी अहमदनगर शहरातील 60 उपकेंद्रावर एकूण 18629 उमेदवार परिक्षेस बसलेले आहेत. या उपकेंद्रावर (शाळा/महाविदयालय) उमेदवारांची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या परीक्षेकामी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी -15 , भरारी पथक प्रमुख-3, वर्ग 1 संवर्गातील उपकेंद्र प्रमुख – 60 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग 3 संवर्गातील 1669 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना परीक्षाकेंद्रावर सकाळी 9.30 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांनी काळया शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्यक असून उमेदवारांना एकमेकांचे पेन लिखान साहित्य इ. वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. सर्व परीक्षार्थी उमेदवार यांनी मुखपट्टी (मास्क), हातमोजे व सॅनिटायजर जवळ बाळगणे अनिवार्य आहे. मोबाईल पेजर डिजीटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने व कॅल्क्युलेटर इ. परीक्षा केंद्राच्या परीसरामध्ये आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणा-या उमेदवारास या परिक्षेसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवणेकामी परिक्षेच्या दिवशी परिक्षाक्षेत्रामध्ये सकाळी 6 वाजेपासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम 1973 चे कलम 144 (3) लागू करण्यात आलेले आहे. असेही श्री.संदीप निश्चित यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे