शेवगाव दि. 8 फेब्रुवारी (प्रतिनिधी )
शेवगांव पोलीस स्टेशन हद्दीतील भगतशिंग चौकाजवळ फिर्यादी नामे राहुल दगडु नरवडे वय २६ वर्षे धंदा फोटोग्राफर रा. कुरुडगांव ता. शेवगांव जि. अ.नगर हे दि. ०२/०२/२०२४ रोजी दुपारी ०३.०० वा. चे सुमा. त्यांचे मित्राची लाल रंगाची स्विप्ट गाडी क्र.एम.एच.१६ डी.सी. ७२१८ मधुन फोटोग्राफीचे सामन आणन्याकरीता येत असतांना भगतसिंग चौक, शेवगांव येचुन येत असतांना एका काळ्या रंगाच्या पल्सर वरुन येवून दोन अनोळखी इसमांनी गाडी आडवी लावून फिर्यादीस जबरदस्ती गाडीचे खाली ओढुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन फिर्यादीचा खिश्यातील मोबाईल व गाडीत ठेवलेली रोख रक्कम ४६००० रु. बळजबरीने काढुन घेवुन निघुन गेले वरुन फिर्यादीचे तक्रारी वरुन शेवगांव पोलीस स्टेशन गुरनं. ७९/२०२४ भा.द.वि.कलम ३९२.३४ प्रमाणे दि.०२/०२/२०२४ रोजी दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी तपासकामी पोलीस पथक तयार करुन सुचना दिल्या व पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांच्या पथकाने शेवगाव शहरातील व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून सदर आरोपी निष्पन्न केले होते. व तांत्रिक तपास करून
पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदार बातमी मिळाली की सदर आरोपी हे बोधेगांव ते हसनापुर जाणारे रोडने जाणार असल्याची गुप्तबातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक दिंगबर भदाणे यांनी अंतरवाली फाटा येथे सापळा लावून थांबले असता आरोपीना पोलीस पथकाची चाहुल लागताच आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतांना पोलीस पथकाने आरोपी वरती जागीच झडप मारुन शर्थीने ताब्यात घेतले व त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली त्यांना अधिक विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्ह्यात अटक केली आहे. गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपीची १) अमोल ज्ञानदेव विघ्ने २) नितिन मारुती ढाकणे दोघे रा. हसनापुर ता. शेवगांव जि. अ.नगर यांना गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला,पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागिय पोलीस अधिकारी सुनिल पाटील उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे,पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील, पोसई लहाने. पोलीस अमलदार सुधाकर दराडे, नाकाडे,उमेश गायकवाड,शाम गुंजाळ,बप्पासाहेब धाकतोडे,एकनाथ गर्कळ, कृष्णा मोरे,संतोष वाघ,राहुल खेडकर अहमदनगर दक्षिण मोबाईल सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांनी केली. असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक दिंगबर भदाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील यांनी आरोपींना मा. न्यायालयात हजर केली असता 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे . आरोपीकडून अनेक गुन्हे उघडकीस शक्यता
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा