अघोषित शिक्षक बांधवांच्या संघर्षातील पहिली यशस्वी पायरी-प्रा.रविंद्र गावडे

अजनुज (प्रतिनिधी)-अघोषित शिक्षक समन्वय संघाने पाठिमागे केलेल्या ५६दिवसांचे धरणे आंदोलन केल्यामुळे या संघर्षातील पहिली यशस्वी पायरी असल्याचे अघोषित शिक्षक समन्वय संघाचे शिक्षक नेते प्रा.रविंद्र गावडे यांनी केले आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या काळात जीवाची पर्वा न करता महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे तथा शिक्षक सेलचे नेते प्रा.प्रकाश सोनवणे, अमरावती विभागाचे माजी शिक्षक आ.श्रीकांत देशपांडे,पुणे विभागाचे माजी शिक्षक आ.दतात्रय सावंत, महाराष्ट्र राज्य टीचर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्षा शुभांगीताई पाटील,अघोषित शिक्षक समन्वय महासंघाचे श्रदेश कुलकर्णी, योगेश नंदन, अर्जुन मुंढे, मयूर नाईकवाडी,बमेश पाटील,संजना भोईर मॅडम,प्रा. भाग्यश्री ढोणे,प्रा.संजय रंगारी आदी शिक्षक बांधव उपस्थित होते.अनेक दिवसांपासून पुणे स्तरावरून मंत्रालय स्तरावर जाण्यासाठी तारीख पे तारीख होत होती पण शेवटी संघाला यश आले.गेली २० वर्षांपासून विनावेतन पोटाला चिमटा घेऊन ज्ञानदानाचे कार्य करत होते.आता कुठेतरी आशेचा किरण दिसू लागला आहे.आता मात्र लवकरात लवकर अनुदान देवून शिक्षकांना पगार सुरू करावा म्हणजे जीवनात आलेला वनवास संपवून जाईल असे ही प्रा.गावडे यांनी सांगितले.आंदोनाला पाठिंबा देण्यासाठी खास करून अहमदनगर शहर संघटनेचे सचिव शंकरराव बारस्कर,प्रा.हेमंत पवार,शरद तनपुरे आले होते.