शिवमंदिर कलशारोहण समारंभ उत्साहात

केडगाव प्रतिनिधी मनीषा लहारे
महाशिवरात्रीचे औचित्य साधून भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,भूषणनगर , केडगाव येथील शिवमंदिराचे कलशारोहण व प्रसाद वाटप सोहळा उत्साहात संपन्न झाला .
‘ मंदिर ही संस्काराची केंद्रे आणि प्रेरणास्थान असून परमेश्वराची उपासना करताना मनाची एकाग्रता हवी ‘ या संकल्पनेने तरुण वर्ग ओंकारेश्वर मित्र मंडळ यांनी पुढाकार घेऊन हा समारंभ उत्साहात पार पडला .
याप्रसंगी मंदिरास फुलांची सजावट, रांगोळी, मंडप यांसह विधिवत पूजा करून मंदिराभोवती कळस प्रदक्षिणा, कळस पूजन, होम-हवन, ध्वजारोहण, कळसरोहन, महाआरती, प्रसाद आदी धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. हर हर महादेव या जयघोषात मंदिरावरचे शिवमंदिराचे कलश रोहन बेलेश्वर येथील बालब्रह्मचारी आदित्यनाथ महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.
अमोल पतंगे, ओंकार सातपुते, प्रथमेश घोडके, शुभम परदेशी, सिद्धार्थ काळे , हर्षल चौधरी, अभिजित काळे, अभिषेक चौरे, आदित्य वायभासे, निखिल ताठे ,बाबु चहाळ, विशाल देशमुख, सचिन कुलकर्णी, इंदर बिद्रे , मनीषा लहारे यांच्या विशेष सहकार्याने हा सोहळा संपन्न झाला .
या सोहळ्यास परिसरातील शिवभक्तांनी उपस्थित राहून शिवपूजा व प्रसादाचा लाभ घेतला.