कौतुकास्पद

आ. रोहित पवार यांची तरुणांमध्ये लोकप्रियता: माजी महापौर अभिषेक कळमकर आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बालघर प्रकल्पातील मुलांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाच्या वतीने खाऊचे वाटप

अहमदनगर दि. 30 सप्टेंबर (प्रतिनिधी:-):-कर्जत जामखेड चे लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व माजी महापौर अभिषेक कळमकर मित्रमंडळ यांच्या वतीने तपोवन रोड येथील बालगृहात फळे व खाऊचे वाटप करण्यात आले.बालगृह प्रकल्पाचे संचालक युवराज गुंड व मुलांनी उपस्थितांचे स्वागत केले.यावेळी मा.महापौर अभिषेक कळमकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भीमराज कराळे,युवराज गुंड सर,अभिषेक जगताप लकी कळमकर,फराज पठाण,चैतन्य ससे ऋषिकेश शेटे,राहुल घोरपडे,गौरव शेटे,गौरव भिंगारदिवे,मोहित जगताप,जय धीवर,अर्जुन दळवी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.महापौर अभिषेक कळमकर म्हणाले की आ. रोहित पवार यांची तरुणांमध्ये लोकप्रियता आहे. त्यांनी मतदारसंघात व राज्यात केलेल्या कामाची नेहमीच चर्चा होत असते. एक अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यांच्या अहवानाला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने बालगृहातील मुलांना फळे व खाऊचे वाटप करण्याचा मित्रमंडळाचा उपक्रम उल्लेखनीय आहे.बालगृहातील विद्यार्थी संघर्ष करीत जीवनाचा प्रवास करीत आहेत. हे पाहुन त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच वाटते. सरकार नको तेथे लाखो रूपये खर्च करते. मात्र, अशा गरीब मुलांना प्राथमिक सुविधा देण्यासाठी पैसे किंवा अनुदान देत नाही. समाजकल्याणच्या अधिकाऱ्यांना याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन अभिषेक कळमकर यांच्यावतीने देण्यात आले .कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अभिषेक कळमकर मित्रमंडळाच्या वतीने सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भीमराज कराळे यांनी केले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे